Pankaja Munde: वैद्यनाथ बँक निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव

परळी वैजनाथ: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे.  पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे तेराही उमेदवार  मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला.


बीडसह राज्यभरात शाखा असलेल्या वैद्यनाथ बँक निवडणुकीचे मतमोजणी बीडच्या बाजार समितीत पार पडली. यामध्ये १७ पैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले होते. यातील विरोधी उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्याएवढेही मतदान मिळालेले नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांनी विरोधात उमेदवार उभे केल्याने ही निवडणूक झाली. परंतु मतदारांनी पंकजा मुंडे यांच्याच पॅनलवर विश्वास दाखवल्याचे दिसून आले.


संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले. एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी १६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, एकूण मतदानाची टक्केवारी ३७.५ इतकी नोंदवली गेली होती.


 

 

 
Comments
Add Comment

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

छत्तीसगड : स्टील प्लांटचे छत कोसळून ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आज, शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. सितलारा येथे असलेल्या गोदावरी स्टील

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

बिग बॉस १९' मध्ये मराठी वाघाला जोरदार पाठिंबा!

प्रणित मोरे आणि बसीर-आमल यांच्यातील वादामुळे महाराष्ट्रातून 'कॉमेडियन'ला मोठा सपोर्ट मुंबई: टेलिव्हिजनवरील

तुकारामांची आवली स्मिता शेवाळे ‘अभंग तुकाराम’मध्ये दिसणार

मुंबई : नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण

गौरव मोरेची फिल्टरपाड्याच्या चाळीतून थेट टॉवरमध्ये एन्ट्री !

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा