मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमुळे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. यावेळी कार आणि बस यांच्या मधोमध असलेली महिला चिरडली गेली. ही महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती आणि दोन वाहनांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून पुढे जात होती त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने मागच्या बाजूने कारला धडक दिली. या अपघातात महिलेचा चिरडून मृत्यू झाला.महिलेच्या शरीराच्या खालील भागाचा चेंदामेंदा झाला.