"खासदारांना मिळणार राजेशाही निवास! ७ BHK, मॉड्युलर किचनसह सर्व सोयी"

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिल्लीच्या बाबा खडकसिंह मार्गावर नव्याने बांधलेल्या खासदारांच्या खास घरांमध्ये. खासदारांचं नवं घर… ऐकायला साधं वाटतं, पण पाहायला? एकदम आलिशान! दिल्लीच्या मध्यभागी उभं राहिलंय नवं, अत्याधुनिक टॉवर कॉम्प्लेक्स… इथे राहणार आहेत देशाचे खासदार. पण यात काय आहे खास? तर चला जाणून घेऊया खासदारांच्या खास घरांची माहिती...


हा आहे दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्ग आणि ही आहेत या ठिकाणी उभी राहिलेली खासदारांसाठीची खास घरं...अर्थात १८४ टाईप ७ आलिशान फ्लॅट्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच त्यांचं उद्घाटन केलंय. यातील प्रत्येक फ्लॅट सुमारे ५ हजार चौरस फुटांचा आहे म्हणजे ७ बीएचके असा. आणि यात आधुनिक सुविधांची रेलचेल आहे. जानेवारी २०२२ मध्ये लोकसभा सचिवालयाने सुरू केलेला हा प्रकल्प ६४६ कोटी रुपयांत पूर्ण झालाय. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी येथे एक सिंदूरचं रोपटं लावलंय. इतकंच नव्हे तर यातील चार टॉवर्सना कृष्णा, गोदावरी, हुगळी आणि कोसी अशी नावंही देण्यात आली आहेत. देशातील या चारही महान नद्या कोट्यवधी लोकांसाठी जीवनदायिनी आहेत. हे कॉम्प्लेक्स केवळ आवास नव्हे, तर एक संपूर्ण जीवनशैली आहे. यात खासदारांच्या फ्लॅट्ससोबत कार्यालय, कर्मचाऱ्यांसाठी आवास, कम्युनिटी केंद्र, दुकानं, गेस्ट रूम, जिम, कँटीन, डिस्पेंसरी आणि ६१२ गाड्यांची पार्किंग आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरांनी सुरक्षित, पॉवर बॅकअप, एटीएम आणि पब्लिक टॉयलेट्सनी सज्ज आहे.



आता चला, या ७ बीएचके फ्लॅटच्या आतील सौंदर्य पाहूया. प्रत्येक फ्लॅट ५ हजार चौरस फुटांचा. ज्यात खासदार घरूनच कार्यालयीन काम करू शकतात. मुख्य प्रवेशद्वार उघडताच समोर येते एक विशाल ड्राईंग रूम, आधुनिक फर्निचर, मऊ कार्पेट आणि बालकनीही. या बालकनीतून दिल्लीचं सुंदर दृश्य दिसतं. खासदारांची घरं बनवताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करण्यात आलाय. खास असा फॅमिली लाऊंज तयार करण्यात आलाय. आरामदायी सोफा, टीव्ही आणि पुस्तकांसाठी शेल्फ्स. या ठिकाणी कुटुंब एकत्र बसून वेळ घालवू शकतं. खासदारांची ही घरं राजवाड्याला शोभतील अशी आहेत. मास्टर बेडरूम, मॉड्युलर अलमारी, सहाय्यकांसाठी दोन खोल्या आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र असं प्रवेशद्वारही आहे. या खोल्यांमध्ये आकर्षक अशी बाथरूमही आहेत. त्यात आधुनिक फिटिंग्स, शॉवर, बाथटब आणि मिरर कॅबिनेट्स यांचा वापर करण्यात आलाय. स्वच्छ, चमकदार टाईल्स आणि व्हेंटिलेशनही करण्यात आलंय. तर दुसरीकडे सुंदर, खास असं पूजाघरही बांधण्यात आलंय.



खासदारांच्या या घरात किचन अर्थात स्वयंपाक घरही उत्तम बनवण्यात आलंय. त्याचबरोबर वायफाय, केबल टीव्ही, टेलिफोन आणि व्हिडीओ डोर फोनसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. खासदार आरामदायी जीवनशैलीबरोबरच घरच्या घरी जनतेची कामंही करू शकणार आहेत. त्यामुळे या फ्लॅट्समध्ये खासदार आरामदायी जीवनशैली जगू शकतील आणि देशसेवेसाठी ऊर्जा देतील. त्याचबरोबर कामगारांच्या मेहनतीचं हे फळ आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. आता खासदारांना आरामदायी जीवनशैलीत जगता येणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरामदायी जीवनासाठी खासदार काय करतात, याकडे तमाम भारतीयांचं लक्ष लागलंय, हे विसरून चालणार नाही.

Comments
Add Comment

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि