Tuesday, August 12, 2025

भिवंडीतून ३२ कोटी रुपयांचे MD जप्त, अंधेरीत परदेशी नागरिकाकडून १.१५ कोटींचे कोकेन जप्त

भिवंडीतून ३२ कोटी रुपयांचे MD जप्त, अंधेरीत परदेशी नागरिकाकडून १.१५ कोटींचे कोकेन जप्त
मुंबई : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडीतून ३२ कोटी रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग (अमली पदार्थ) जप्त केले तर मुंबईत अंधेरी पूर्व येथील मरोळ विजयनगर परिसरात एमआयडीसी पोलिसांनी १.१५ कोटींचे कोकेन जप्त केले. भिवंडीतून पोलिसांनी १६ किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग (अमली पदार्थ) जप्त केले. अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी मरोळ विजयनगर परिसरातून २७८.८० ग्रॅम कोकेन जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग प्रकरणात भिवंडीत दोघांना आणि अंधेरीत एकाला अटक करण्यात आली आहे.

भिवंडीच्या प्रकरणात पोलिसांनी एक बीएमडब्ल्यू आणि एक स्विफ्ट डिझायर अशा दोन कार जप्त केल्या आहेत. बीएमडब्ल्यू कारवर ठाणे महापालिकेचे बोधचिन्ह आढळले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी भिवंडीतल्या ड्रग रॅकेट प्रकरणी पाळंमुळं उखडून काढण्यासाठी सखोल तपास हाती घेतला आहे. तर अंधेरीच्या प्रकरणात पोलिसांनी घानाचा नागरिक असलेल्या ३४ वर्षांच्या हेन्री अलमोह याला अटक केली आहे हेन्री अलमोहकडून पोलिसांनी महागडा मोबाईल तसेच रोख रक्कम आणि कोकेन जप्त केले. आरोपी कोकेन कोणासाठी घेऊन आला होता या व्यवहारात इतर कोणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे ? याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment