सोन्या चांदीच्या दरात घसरण सोन्याच्या दरात तर थेट १४०० रूपयांनी घसरण ! 'हे' जागतिक कारण महत्वाचे

  34

मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. सोन्यात आज सलग तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनवरील अतिरिक्त टॅरिफ ९० दिवसांसाठी पुढे ढकलल्याने कमोडिटी बाजारात आश्वासकता निर्माण झाली परिणामी आज घसरण झाली आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्याचा आयातीव टॅरिफमध्ये आकारणी करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सोन्यात दरबदल (Correction) झाले आहे. या घोषणेनंतर सोन्याच्या दरात थेट १४०० रूपयांनी घसरण झाली आहे. एमसीएक्समध्ये तर कमोडिटी बाजारातील इंट्राडेत सोने १२९५ रुपयांनी म्हणजेच १.२७% स्वस्त झाले होते.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळा वरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८८ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६६ रूपयांनी घट झाली. परिणामी अनुक्रमे सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०१४० रूपये, २२ कॅरेटसाठी ८० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६०५ रूपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील, माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८८० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८०० रुपयाने, १८ कॅरेट सो न्याच्या प्रति तोळा किंमतीत ६६० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति तोळा दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०१४०० रूपये,२२ कॅरेटसाठी ९२९५० रूपये,१८ कॅरेटसाठी ७६०५० रूपयांवर पो होचले आहेत.

आज जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.१९% घसरण झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.१८% वाढ झाल्याने प्रति डॉलर सोन्याची दरपातळी ३३४८.६९ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये दुपारपर्यंत ०.१७% घसरण झाल्याने सोन्याची दरपातळी १००१४८.०० रूपयांवर गेली आहे. भारतातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याची सरासरी दरपातळी २४ कॅरे टसाठी १०१४० रूपये,२२ कॅरेटसाठी ९२९५ रूपये,१८ कॅरेटसाठी ७६७५ रुपयांवर पोहोचली आहे. आज युएस चीन बोलणीला यशस्वी स्वरूप आल्याने बाजारात सकारात्मकता होती ज्याचा फायदा कमोडिटी बाजारातही पडला. कमोडिटीतील प्रत्यक्ष सोन्याच्या मागणीत घसरण झाल्याने तसेच स्पॉट बिडिंगमध्ये मागणी घटल्याने ही सोन्यात घसरण झाली. दुसरीकडे युएस डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्यानेही सोन्याच्या पातळीला भारतातही सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे.जागतिक सोन्याच्या निर्देशांकात दिवसभरात घसरण सुरु असल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक होता. त्यामुळे सोन्याची सप्लाय चेनवर दबाव आला नाही. याखेरीज अमेरिकेतील बाजारात आगामी दिवसात जुलै महिन्यातील महागाईची आकडेवारी जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी गुंतव णूक करताना सावधगिरी बाळगली असल्याची शक्यता अधिक आहे. आशियाई बाजारातील झालेल्या रॅलीनंतर त्याचा फायदा आज सकाळी शेअर बाजारात झाला. जो आता सोन्यातही परिवर्तित होत आहे.

आजच्या सोन्याच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे मेटल विश्लेषक मानव मोदी म्हणाले आहेत की,'गेल्या आठवड्याच्या अखेरीस रशिया-युक्रेन युद्धबंदीची शक्यता आणि स्विस गोल्ड टॅरिफमध्ये घट झाल्यामुळे गे ल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच होती. यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने एक निर्णय जारी केला होता की वॉशिंग्टन अमेरिकेत सोन्याच्या बारांना देश-विशिष्ट आयात शुल्काखाली ठेवू शकते, ज्यामुळे धातूच्या जा गतिक पुरवठा साखळ्यांना धक्का बसला असता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की ते सोन्यावर शुल्क लादणार नाहीत, ज्यामुळे चालू जागतिक व्यापार वादात सोने अडकू शकते अशा अटकळांचा अंत झाला. दरम्यान, अमेरिका आणि चिनी अधिकाऱ्यांमधील बैठकीत, अध्यक्ष ट्रम्प यांनी एनव्हीडियाला चीनला शुल्क आकारून प्रगत चिप्स विक ण्याचा मार्ग उघडला. अमेरिका आणि चीनने पुन्हा एकदा तिहेरी अंकी टॅरिफ टाळून त्यांच्या टॅरिफ ट्रुसला 90 दिवसांपेक्षा जास्त काळ वाढवले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबं दीबाबत आशावादही वाढत आहे, तथापि, या आठवड्याच्या अखेरीस अमेरिका आणि रशिया भेटल्यानंतरच बाजाराला अधिक स्पष्टता मिळेल. सीएमई फेड वॉच टूलच्या अहवालातून असे दिसून आले आहे की सप्टेंबरच्या बैठकीत दर कपातीसाठी बाजारातील सहभागी 85% संभाव्यतेमध्ये किंमत ठरवत आहेत. या दिवसाचे लक्ष अमेरिकेच्या सीपीआय डेटावर असेल जे या वर्षी होणाऱ्या धोरण बैठकांसाठी फेडच्या भूमिकेबद्दल स्पष्टता प्रदान करेल.'

चांदीतही घसरण !

दोन दिवसांच्या चांदीच्या जैसे थे दरानंतर आज चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. प्रामुख्याने औद्योगिक मागणीतील झालेल्या किरकोळ घसरणीसह जागतिक चांदीच्या दरातही स्थिरता आल्याने चांदी घसरली. मात्र संध्याकाळपर्यंत पुन्हा चांदीतही वा ढ होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याप्रमाणेच चांदीच्या मूल्यांकनात डॉलर घसरल्याने वाढ झाली नाही. संध्याकाळपर्यंत मात्र चांदीच्या स्पॉट बेटिंग मागणीत पुन्हा वाढ सुरु झाल्याने वाढ होणे अपेक्षित असले तरी अजूनही भारतीय सराफा बा जारातील चांदीच्या दरात आज सरासरी घसरणच झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात २ रुपयाने, प्रति किलो दरात २००० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर ११५ रूपये, प्रति किलो दर ११५००० रूप यांवर गेला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सरासरी चांदीचा प्रति ग्रॅम दर ११५ रूपयांवर व प्रति किलो दर ११५००० रूपयांवर गेला आहे.  जागतिक बाजारपेठेतील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.०१% घसरण झाली होती. तर भार तातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात ०.०२% घसरण झाल्याने चांदीची दरपातळी ११३२७०.०० रूपयांवर पोहोचली आहे. भारताच्या चांदीच्या दरात आज घसरण झाल्याने आज कमोडिटी बाजाराला वेटेज मिळाले यात शंका नाही.
Comments
Add Comment

सरकारकडून कॅबिनेट बैठकीत आत्मनिर्भर भारतासाठी ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

प्रतिनिधी: भारताकडून आणखी एक धोरणात्मक निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. टॅरिफचा विरोध झुगारून भारत सरकारने ताठ

सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्कची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी

मुंबई: सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने ३० जून २०२५ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीसाठी आपला अनऑडिटेड तिमाही

"खासदारांना मिळणार राजेशाही निवास! ७ BHK, मॉड्युलर किचनसह सर्व सोयी"

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिल्लीच्या बाबा खडकसिंह मार्गावर नव्याने बांधलेल्या खासदारांच्या खास

प्रसार भारती आणि एईएक्स स्पोर्ट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

मुंबई: भारताच्या क्रीडा मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन घडविणारे एक महत्त्वाचे पाऊल उचलत राष्ट्रीय सार्वजनिक

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: वाढता वाढता घसरे भेदीले शून्य बाजारा ! सेन्सेक्स निफ्टी कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:वाढता वाढता घसरे भेदीले शून्य बाजारा ! ही उपमा आजच्या बाजारासाठी चपखल ठरेल. आज अखेरच्या सत्रात इक्विटी

Delhi Stray Dogs : दिल्लीतील रस्ते होणार ‘कुत्रेमुक्त’? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्राणीप्रेमी संतप्त

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी