
नवी दिल्ली: माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. 1xBet या अवैध ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जाणार आहे.
ईडीकडून अनेक दिवसांपासून 1xBet आणि अशा इतर अनेक ऑनलाइन बेटिंग ॲप्सच्या विरोधात तपास सुरू आहे. हे ॲप्स अवैध जुगार आणि मनी लाँड्रिंगमध्ये सामील असल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, ज्यांनी या ॲप्सचे प्रमोशन केले होते.
सुरेश रैनाने 1xBet ॲपचे 'रिस्पॉन्सिबल गेमिंग ॲम्बेसेडर' म्हणून काम केले होते. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ईडी या प्रकरणात या ॲपच्या जाहिरातीतून मिळवलेले पैसे आणि इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे.