Tuesday, August 12, 2025

तुरुंगातून बाहेर येताच सय्यदला तिनं हार घातला आणि रात्री सय्यदनेच तिच्यावर गोळीबार केला

तुरुंगातून बाहेर येताच सय्यदला तिनं हार घातला आणि रात्री सय्यदनेच तिच्यावर गोळीबार केला
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. हर्सूल तुरुंगातून बाहेर आलेल्या सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा याचे त्याच्या मैत्रीणीने हार घालून स्वागत केले. पण रात्री अनेपेक्षित असे घडले. सय्यदने मैत्रीणीला भेटून तिच्यावर थेट गोळीबार केला. या गोळीबारात सय्यदची मैत्रीण जखमी झाली. जखमी असलेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

सय्यद किलेअर्क भागातील रहिवासी आहे. स्थानिक त्याला गुंड म्हणूनच ओळखतात. तुरुंगातून बाहेर आलेल्या सय्यदचे मैत्रीणीने हार घालून स्वागत केले होते, त्यामुळे त्याने मैत्रीणीवर रात्री अचानक भेटून गोळीबार का केला ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सय्यदवर बलात्कार, शस्त्रसाठा, ड्रग्स तस्करी, खुनाचा प्रयत्न, चोरी यासारखे पंधरा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. रात्री तो नशा करुन बेगमपुरात मैत्रीणीला भेटण्यासाठी आला. यावेळी सय्यद आणि त्याच्या मैत्रीणीचा वाद झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यानंतर सय्यदने मैत्रीणीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत सय्यद पळून गेला होता. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि लगेच तपास सुरू केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >