Tuesday, August 12, 2025

ॲस्ट्रेल कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांनी नाकारला ८% कोसळला

ॲस्ट्रेल कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांनी नाकारला ८% कोसळला
प्रतिनिधी:ॲस्ट्रेल कंपनीच्या शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात ७.३७% म्हणजेच जवळपास ८% घसरण झाली आहे. कंपनीच्या खराब तिमाहीतील कामगिरीनंतर गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये नकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीच्या शेअ र्समध्ये सेल ऑफ वाढल्याने आज कंपनीच्या भांडवली बाजाराला नुकसान झाले आहे. सकाळच्या सत्रात ११.४८ वाजेपर्यंत ७.३७% नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बाजारच्या सुरूवातीलाच ५% ने शेअर्सची घसरण सुरू झाली.

प्लास्टिक बनवत असलेल्या कंपनीला या तिमाहीत इयर बेसिसवर ३०% निव्वळ तोटा (Net Loss) झाला होता जो ८११ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकत्रित महसूलात (Consolidated Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २% घसरण झाली.कंपनी च्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर घसरण झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील १२०.४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ८१.१ कोटींवर नफा पोहोचला होता. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई) इयर ऑन इयर बेसिस व र १४% घसरण झाली होती. कंपनीने कमकुवत कामगिरीचे कारण पॉलिमरच्या किमतींमधील अस्थिरतेला दिले आहे ज्यामध्ये पहिल्या तिमाहीत सरासरी पीव्हीसीच्या किमती वार्षिकदृष्ट्या सुमारे १४% कमी झाल्या आहेत आणि आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमा हीच्या तुलनेत सलग ४-५% घट झाली आहे.
Comments
Add Comment