
ठाणे महापालिकेत मेगाभरती, 'गट-क व गट-ड' पदांसाठी १ हजार ७७३ रिक्तपदे जाहीर
ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिकेत १७७३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ही भरती सरळसेवा प्रवेशाने होणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा या सर्वांमधील पदे भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेत एकूण १७७३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून म्हणून १२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्ही www.thanecity. gov.in या वेबसाइटवर जाऊन करू शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवह परीक्षेद्धारे होणार आहे. ऑनलाइन परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर www.thanecity.gov.in दिली जाणार आहे.
त्यानंतर परीक्षा, प्रवेशपत्र याचीही माहिती ऑनलाइन मिळणार आहे. सहायक परवाना निरीक्षक, टंकलेखक, लिपीक लेखा, अभियंता, प्रदूषण निरीक्षक, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, फायरमन, उपचार तन्त, मानसोपचार तज्ञ, परिचारिका, बायोमेडिकल इंजिनीयर, फिजियोथेरेपिस्ट, फिजिसिस्ट, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.