
प्रतिनिधी:महाराष्ट्रीयन स्त्रियांचा शेअर बाजारात डंका असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या बाजाराच्या नवीन अहवालातील माहितीनुसार, शेअर बाजारातील गुंतवणूकीत सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रातील महिलांचे आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. जून २०२५ मधील अहवालातील निरीक्षणानुसार, नवीन युनिक रजिस्ट्रेशन (नोंदणी) आकडेवारीत क्रमांक १ वर महाराष्ट्रातील महिला असून त्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२३ मधील२५.६% वरून वाढत २८.४% वर पोहोचली आहे. क्रमांक दोनवर गुजरातमधील महिला आहेत.मात्र आश्चर्यकारकरित्या तरूण गुंतवणूकदारांचे प्रमाण शेअर बाजारात गुंतवणूकीत घटले असल्याचा खुलासा या अहवाला ने केला. अहवालात म्हटले गेले आहे की, 'राज्यांमध्ये महिला गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. मार्च २०२४ मध्ये ३० वर्षांखालील गुंतवणूकदारांचा वाटा ४० टक्क्यांवरून मार्च २०२५ मध्ये ३९.५ टक्क्यांपर्यंत आणि जून २०२५ मध्ये ३९ टक्क्यांपर्यंत घसरला.'
क्रमवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये महिलांचा सहभाग २६.६% वरून जून २०२५ मध्ये २७.८% वर वाढला आहे. असे अहवालात म्हटले. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आधार असलेला उत्तर प्रदेश लिंग प्रति निधित्वात (Gender Participation) मात्र अजूनही मागे आहे. अहवालानुसार, राज्यात गुंतवणूकदारांमध्ये महिलांचा वाटा फक्त १८.७ % आहे, जो राष्ट्रीय सरासरी २४.५% पेक्षा खूपच कमी आहे, जरी आर्थिक वर्ष २३ मध्ये १६.९% वरून ही लक्षणीय सुधारणा मा नली जात आहे. एकूणच, भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये आता महिला गुंतवणूकदारांचा वाटा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे, जो आर्थिक वर्ष २३ मध्ये फक्त ४४% होता. अहवालात असेही नमूद केले आहे की बाजारपेठेत लिंग समावेशनात (Gender D iversity) अनेक लहान प्रदेश (States) आघाडीवर आहेत.
अहवालातील माहितीनुसार, छोट्या राज्यांच्या या यादीत गोवा अव्वल आहे त्यानंतर मिझोरामचा क्रमांक लागतो. चंदीगडमध्ये ३२ टक्के महिला गुंतवणूकदार, दिल्ली ३०.५% आणि सिक्कीममध्ये ३०.३% महिला गुंतवणूकदार आहेत, जे सर्व राष्ट्रीय सरासरीपेक्षा ल क्षणीयरीत्या जास्त आहेत. महिलांचा सहभाग वाढत असताना, एनएसईच्या आकडेवारीनुसार तरुण गुंतवणूकदारांच्या वाट्यात घट झाल्याचेही दिसून आले आहे. ३० वर्षांखालील गुंतवणूकदारांचे प्रमाण मार्च २०२४ मध्ये ४०% वरून जून २०२५ पर्यंत ३९% पर्यंत घ सरले. या वयोगटातील नवीन गुंतवणूकदारांच्या वाट्यात घट झाल्यामुळे ही प्रवृत्ती मुख्यत्वे घडली आहे. अहवालातील आकडेवारीनुसार भारतीय शेअर बाजारात लिंग विविधता सुधारत असताना, तरुण सहभागींच्या प्रवेशातही मंदी येत आहे.