
मुंबई : ११ ऑगस्टपासून नवा आठवडा सुरू होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हिशेबाने हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्योतिषगणनेनुसार या आठवड्यात अनेक राशींना भाग्याची साथ मिळू शकते. शनी वक्री झाल्याने या ४ राशींच्या जातकांना फायदा होईल.
मेष
हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह आणि उर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
मिथुन
तुमच्यासाठी हा आठवडा जबाबदारीने भरलेला असेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. नात्यात गोडवा कायम ठेवा.
वृश्चिक
व्यापारात वृद्धी होईल. गुप्त स्त्रोतांकडून धन प्राप्ती होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याच्या लहानसहान कुरबुरी जाणवू शकतात. सोबतच तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो. जुने कर्ज फेडाल. पैशांची आवक कायम राहील.
धनू
तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कर्ज अथवा गुंतवणुकीशी संबंधित समस्या सुटतील. अचानक धन प्राप्ती होईल. या आठवड्यात या राशीच्या कुटुंबात शांतता राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. परदेशी प्रवास करणाऱ्या लोकांचे स्वप्न साकार होऊ शकते.