Monday, August 11, 2025

अरण्य' चित्रपटात उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी, लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित

अरण्य' चित्रपटात उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी, लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : एस एस स्टुडिओ निर्मित 'अरण्य' या आगामी मराठी चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर प्रेक्षकांमध्ये चित्रपटातून उत्सुकता वाढवत आहे. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांच्या निर्मिती असलेला हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केले आहे.


मोशन पोस्टरची खास झलक
प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये जंगलाची दाट हिरवळ, धुक्याने भरलेले गूढ वातावरण आणि त्यातील थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अभिनेत्या हार्दिक जोशीचा लूक यात विशेष लक्षवेधून घेतो. त्याच्या डोळ्यात असलेला राग आणि निर्धार एक भयानक संघर्ष सांगत आहे. त्याच्यासोबतच वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.


दिग्दर्शक आणि निर्मात्यांची मते
दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांच्या मते, 'अरण्य' ही फक्त जंगलाची कथा नसून ती मानवी जीवन, निसर्गाशी असलेले आपले नाते आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या माणसाची कहाणी आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना जंगलातील रहस्य आणि भावनांचा अनुभव देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


निर्माते शरद पाटील यांनी सांगितले की, आजच्या सिनेमांमध्ये तंत्रज्ञान आणि भावनांचा मिलाफ फार कमी पाहायला मिळतो. ‘अरण्य’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देईल. हा चित्रपट निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचं एक प्रतिबिंब आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा