Monday, August 11, 2025

Pune Accident: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणारी पिकअप दरीत कोसळली, ६ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Accident: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणारी पिकअप दरीत कोसळली, ६ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

खेड: पुण्यातील खेड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महिला भाविकांनी खच्चून भरलेली पीकअप दरीत कोसळली. या पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रवासी बसले होते, ज्यामुळे कुंडेश्वर मंदिराकडे जाताना नागमोडी वळणावर घाट चढताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली.


या दुर्दैवी अपघातात ६ महिलांचा मृत्यू झाला तर २० महिलांची परिस्थिती चिंताजनक आहे. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे.



 

आज श्रावण महिन्याच्या तिसरा सोमवार असून, या निमित्ताने महिला भाविक कुंडेश्वरच्या दर्शनासाठी ज्या पिकअपने जात होत्या, त्या पिकअपमध्ये तब्बल ३० ए ३५ महिला भाविक प्रवास करत होत्या. या दरम्यान नागमोडी वळणावर घाट चढताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप जीप पलटली, या पिकअपने ५ ते ६ पलटी खाल्ल्यामुळे त्यातील महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >