Monday, August 11, 2025

शेअर बाजारात घरगुती गुंतवणूकदारांचा टॉप गिअर दबावाला झुगारून मोठा प्रतिसाद मिळाल्याने सेन्सेक्स निफ्टी तुफान उसळला 'हे' आहे विश्लेषण

शेअर बाजारात घरगुती गुंतवणूकदारांचा टॉप गिअर दबावाला झुगारून मोठा प्रतिसाद मिळाल्याने सेन्सेक्स निफ्टी तुफान उसळला 'हे' आहे विश्लेषण
मोहित सोमण:आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी अखेरच्या सत्रात आश्चर्याचा धक्का दिला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७४६.२९ अंकाने उसळत ८०६०४.०८ पातळीवर व निफ्टी ५० २२१ .७५ अंकांनी उसळत २४५८५.०५ पातळीवर स्थिरावला आहे. अखेरच्या सत्रात आज मोठी वाढ अपेक्षित नव्हती. मात्र ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये मोठी रॅली झाल्याने निर्देशांक उंचावला गेला. अस्थिरता जगात चालू असताना देखील आशियाई बाजारापाठोपाठ आज भारतीय बाजारात झालेल्या वाढीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अखेरच्या सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६९१.०७ अंकाने वाढ झाली असून बँक निफ्टीत ५०५.८५ अंकांने वाढ झाली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९८%,०.७९% अंकांने वाढ झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८५ %, ०.३६% वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील ज्या स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली होती ती अखेरीस रॅलीमध्ये बदलली. आज बाजारात मोठी चढ उतार झाली आहे. सकाळी अस्थिरता निर्देशांक ३% पेक्षाही अधिक उसळला होता तो अखेरच्या सत्रात १.५३% वर बंद झाला ज्यामध्ये अखेरच्या काही तासांत बाजारातील कंपनीच्या शेअर्समध्ये स्थिरता मिळण्यास मदत झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशां कात (Nifty Sectoral Indices) मध्ये अखेरच्या सत्रात सकाळच्या सत्रातही घसरलेले कंज्यूमर ड्युरेबल्स (०.७२%) वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे. पीएसयु बँक (२.२०%), खाजगी बँक (०.८१%), रिअल्टी (१.८६%),ऑटो (१.०६%) समभागात वाढ झाली आहे.

आज शेअर बाजारातील गुंतवणूकीत घरगुती गुंतवणूकदाराचा मोठा पाठिंबा मिळाल्याने बाजारात रॅली होणे शक्य झाले आहे. आज हेवी वेट एसबीआय, एचडीएफसी, रिलायन्स यांसारख्या शेअर्स मध्ये वाढ झाल्याने बाजारात मोठी रॅली झाली. आजच्या वाढीने ओशाळलेल्या बाजाराला नवा आशेचा किरण मिळाला आहे. सतत सोन्याच्या सहा वेळा वाढी नंतर पुन्हा बाजारात दुसऱ्यांदा घसरण झाली आहे ज्यामुळे बाजारात सापेक्षता निर्माण झाली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात २.२७% इतकी मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या निर्देशां कात आज सकाळी मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी पुतीन व ट्रम्प यांच्यात बैठक होणार आहे ज्यावर कच्च्या तेलासह युक्रेन रशिया वादासंबंधित तोडगा काढला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणू कदारांना आशा निर्माण झाली व तसेच जागतिक पातळीवरील स्पॉट निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने तेलाच्या किमतीत घसरण झाली. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशां कात ०.२३% वाढ झाली होती तर Brent Futures निर्देशांकात ०.१७% वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत रुपयांच्या दरातही डॉलरच्या तुलनेत घसरण झाली होती.

संध्याकाळपर्यंत आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०४%) बाजारात किरकोळ वाढ झाली. आज दिवसभरातील उत्तरार्धात आशिया शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये निके यी २२५ (१.८२%),तैवान वेटेड (०.४७%), जकार्ता कंपोझिट (०.९५%), शांघाई कंपोझिट (०.३४%) बाजारात वाढ झाली आहे. तर हेंगसेंग (०.१७%), कोसपी (०.१०%) बाजारात घसरण झाली आहे.

अखेरच्या सत्रात एचबीएल इंजिनिअरिंग (१४.०३%), डोमस इंडस्ट्रीज (९.४२%), साई लाईफ (७.८९%), होम फर्स्ट फायनान्स (६.६५%), वन ९७ (५.६१%), पीबी फिनटेक (५.१५%), अदानी एं टरप्राईजेस (४.८३%), कल्पतरू प्रोजेक्ट (४.५८%), स्विगी (४.१३%), सारडा एनर्जी (४.०३%), आनंद राठी वेल्थ (४.०९%), इंडियन बँक (३.५६%), जेएसडब्लू एनर्जी (३.२४%),टाटा मोटर्स (३.१ ६%), एनबीसीसी (४.१३%), जेएम फायनांशियल (३.०३%), अदानी पॉवर (२.९५%), विशाल मेगामार्ट (२.१५%), सनफार्मा (१.३५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.३५%), एचडीएफसी बँक (१.०१%) समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे.

अखेरच्या सत्रात पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (१४.०६%),अंबर एंटरप्राईजेस (६.०१%), पीटीसी इंडस्ट्रीज (५.५८%), वेल्सस्पून लिविंग (३.३८%),सम्मान कॅपिटल (३.२४%), जेएसडब्लू होल्डिंग्स (३.१७ %), न्यूजेन सॉफ्टवेअर (०.९५%), लेमन ट्री हॉटेल (०.८४%), ओला इलेक्ट्रिक (०.७२%) समभागात सर्वाधिक घसरण झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले की,' आज अमेरिकेत टेरिफ लागू होऊन तीन दिवस झाले आहेत.प्रत्येक वस्तु महाग झाली आहे.वाहनांपासुन ते चप्पलबूटांपर्यंत आयातीत खाद्य पदार्थ ही आयात शुल्कामुले महाग झाले आहेत. अमेरिकेत जनता रस्त्यावर उतरून ट्रम्पचा व टेरिफचा उघड उघड विरोध होत आहे. पुढील काही दिवसात टेरिफचे काय होणार हे स्पष्ट होईल. पण भारताला ५०% टेरिफची कारणं म्हणजे युद्ध सामग्री च्या व्यवसायात एक दमदार प्रति स्पर्धी निर्माण झालेला अमेरिकेला सहन होत नाहीये हेच खर कारण आहे. 'तेजस' फायटर जेट ,एअर डिफेन्स सिस्टम संपूर्ण स्वदेशी बनावट व या सर्व गोष्टी जगात सर्वात स्वस्त भारत उपलब्ध करतोय .म्हणून 'तेजस' चे ईंजिन पुरवठा केला नाही. त्यामुळेच तेजस विमाने वेळेवर डिलीवर होऊ शकली नाहीत. हा सर्व घटनाक्रम पडद्याआड गेली दोन वर्षांपासून सुरू होताच .५९% टेरिफ हा त्याचाच भाग आहे. त्यामुळेच भारताने फ्रान्स इंग्लंड या देशातील इंजिन टेक्नोलॉजीस आयात व भारतात उत्पादन असे प्रयत्न सुरूच आहेत.

शिवाय कावेरी इंजिनही कधीही सर्व टेस्ट पास करून येईल. एकंदरीत अमेरिकेच्या मुलभूत व पारंपरिक व मोनोपोली असलेला व्यवसायात भारताची प्रगती इतके दिवस अदखलपात्र वाटत अस ताना भारताने पाकिस्तान युद्धात आपल्या शस्त्र सामग्रीचा लाईव्ह डेमो जगाला दाखवून दिला. पण तरीही एफ ३५ हे सर्व श्रेष्ठ आहेच हे दाखवून देण्यासाठीच हेरगिरी करण्याच्या मोहीमेवर आलेले हे विमान भारताने रडारवर पकडले केरळमधील महीनाभर जखडून ठेवले व त्या मुळे उरली सुरली पतही एफ ३५ ची संपली. या विमानाचे सगळे दावे भारताने फोल ठरवले व जागतिक बाजारात या विमानाची किंमत संतली.भारताने या खरेदीला स्पष्ट नकार दिला. कालच स्पेन व स्विट्जरलैंड नेही या विमान खरेदी नकार कळवला.

या सर्व पार्श्वभूमीवर भारताला कोणताही आर्थिक फायदा अमेरिकेमुले होऊ देणार नाही .आर्थिक संकट अमेरिकेत असताना रोज ३ मिलीयन डाॅलर व्याज भरावे लागत आहे. अशा परिस्थितीत उ त्पन्नात वाढ कशी करावी हे ट्रम्प यांना समजत नसावं.आज भारताची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असं ते जगाला सांगतं होते,पण अमेरिकन नीती व व्यवहार यामुळेच भारतानेही या सर्व गोष्टींव रील जास्त लक्ष न देता इतर बाजार पेठांचा शोध सुरू केलेला दिसतोय व नव नवीन देशही मित्र देश म्हणुन समोर येत आहेत. मागील ११ वर्ष आपले पंतप्रधान एवढे देशांना का भेट देत आहेत त्या ची उत्तर आज मिळाली आहेत. आज आपल्या कंपन्या ज्या अमेरिकेत निर्यात करीत होत्या त्यांना काही काल त्रास होईल, पण एकंदरीत नवीन जास्त बिझनेस मिळेल असे आज तरी वाटत आहे, कारण संपूर्ण जगाची आज हीच अवस्था आहे.

आज बाजाराने आपली दिशा स्वता: ठरवलेली दिसत आहे. व अमेरिकेतील बिझनेस शिवाय व्यापार हे मान्य करून पुढील वाटचाल सूरू केलेले दिसत आहे.त्यातच मागील काही दिवसांपासून वि देशी गुंतवणूकदारांकडून केलेले शाॅर्ट सेल मुळेतेही ट्रॅप झालेले दिसत आहेत. त्यांना पोझिशन सेटल करायची असल्यास काही काळ खरेदीस बाजारात रहावेच लागेल.त्यामुळेच तेजी काही दिवस राहील.टेक्निकली बाजार निफ्टी २४३५० पर्यंत खाली जाऊन आला आहेच. आज सर्व स्थरावर खरेदी होताना दिसत आहे.रिलायन्स,टीसीएस,अल्ट्रा टेक, एचडीएफसी वगैरे वाढलेले दिसत आहेत.

अमेरिकेमुळे जग थांबलं, घाबरलं असे मानण्याचे दिवस संपले आहेत .भारत या सर्व गोष्टींवरील कंट्रोल जराही न घालवता शांतपणे रशिया व इतर देशांशी व्यापार सौदे करण्यात मग्न आहे हे जगा च्या पोझिशन बदलत आहेत हे दाखवुन देत आहे.आपला शेअर बाजार व आर्थिक स्थैर्य कोणीही विचलित करू शकत नाही हे भारत शांत राहुन जगाला दाखवून देत आहे..सो किप इन्व्हेसमटिंग….'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीनंतर बाजारात दि लासादायक तेजी दिसून आली; सकारात्मक जागतिक संकेत आणि एफआयआयच्या हळूहळू परताव्याने भावनेला पाठिंबा दिला. बँकिंग क्षेत्रातील पहिल्या तिमाहीच्या निकालांमुळे सार्वजनिक क्षे त्रातील बँकांनी प्रकाशझोतात आणले, तर सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक गती दिसून आली. गुंतवणूकदार या आठवड्यात होणाऱ्या अमेरिका-रशिया शिखर परिषदेचे सकारात्मक मूल्यांकन करत आहेत, ज्यामुळे भूराजकीय तणाव कमी होण्याची शक्यता आहे. जरी जवळच्या काळात सावधगिरी बाळगली जाऊ शकते, तरी अमेरिकेच्या व्यापार आणि वाढीच्या परिणामाचे अधिक निश्चित मूल्यांकन अद्याप पूर्णपणे मूल्यांकन करणे बाकी आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग रिसर्चच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,' ११ ऑगस्ट २०२५ रोजी भार तीय शेअर बाजार अस्थिर व्यापार सत्रानंतर वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स ७४६.२९ अंकांनी किंवा ०.९३ टक्क्यांनी वाढून ८०६०४.०८ वर बंद झाला, तर निफ्टी २२१.७५ अंकांनी किंवा ०.९१ टक्क्यां नी वाढून २४५८५.०५ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांकात ०.८ टक्के वाढ झाली आणि स्मॉलकॅप निर्देशांकात ०.३५ टक्के वाढ झाली.निफ्टी सपाट स्थितीत उघडला परंतु त्याने जोरदार पु नर्प्राप्ती केली, २३० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आणि तो मागील दिवसाच्या उच्चांकाजवळ संपला. या किमतीच्या कृतीमुळे तेजीचा कॅंडलस्टिक पॅटर्न आला, जो सतत खरेदीची आवड आणि गती दर्शवितो. तांत्रिकदृष्ट्या, २४६५० पातळीच्या वर निर्णायक हल २४८५० पातळीच्या वर चढण्याचा मार्ग मोकळा करू शकतो, तर तात्काळ आधार २४५०० आणि २४३३० पातळीवर आहे. दोन्ही न वीन दीर्घ पोझिशन्ससाठी आकर्षक पातळी मानली जातात. क्षेत्रानुसार, ग्राहकोपयोगी वस्तू वगळता, इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, फार्मा, धातू,ऑटो, तेल आणि वायू, सार्वजनिक क्षे त्रातील बँका आणि रिअल्टी ०.५-२ टक्क्यांनी वाढले. बँक निफ्टीमध्येही दिवसादरम्यान सुमारे ५८० अंकांची तीव्र उलथापालथ दिसून आली, ज्यामुळे एक मजबूत तेजीची मेणबत्ती तयार झाली जी खरेदीची आवड कायम असल्याचे दर्शवते. २० आठवड्यांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अँव्हरेज (EMA) जवळ त्याला मजबूत आधार मिळाला, जो खरेदीदारांची उपस्थिती दर्शवितो खालच्या पात ळीवर. प्रमुख आधार आता ५५३२० आणि ५५००० पातळीवर आहेत, ५५७००-५६००० पातळीच्या श्रेणीत प्रतिकार आहे. या प्रतिकार बँडच्या (Resistance Band) वर एक खात्रीशीर ब्रेकआउट मानसिक ५६२०० पा तळीच्या चिन्हाकडे रॅलीचा मार्ग मोकळा करू शकतो.'

बाजारातील अस्थिरतेचे प्रमुख निर्देशांक असलेला इंडिया VIX १.५४ टक्क्यांनी वाढून १२.२१ वर पोहोचला, जो अनिश्चिततेत घट आणि गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये सुधारणा दर्शवितो. डेरिव्हेटि व्ह्ज विभागात, ओपन इंटरेस्ट डेटाने २४६०० स्ट्राइकवर सर्वाधिक कॉल रायटिंग दर्शविली, तर सर्वोच्च पुट ओआय २४५०० आणि २४४०० पातळीवर केंद्रित होता. या स्थितीवरून असे सूचित हो ते की प्रतिकार २४६०० पातळीच्या जवळ कायम आहे; तथापि, व्यापारी संभाव्य वाढीची अपेक्षा करत आहेत, तेजीची गती राखण्यासाठी या पातळीपेक्षा सतत बंद होणे आवश्यक आहे.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना सेंट्रम ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक निलेश जैन म्हणाले की,' सध्याच्या घसरलेल्या आठवड्याची सुरुवात उत्साहाने झाली कारण तेजीत तेजी दिसून आली. निफ्टीने पुन्हा एकदा १००-डीएमएची पातळी गाठली, जी २४५०० पातळीच्या मानसिक पातळीशी जुळते, आता २४३४० पातळीवर पुढील पात ळी गाठून तात्काळ आधार म्हणून काम करत आहे. किंमत रचना २४७५० च्या दिशेने आणखी ओढण्याची शक्यता दर्शवते. जरी व्यापक कल कमकुवत राहिला तरी, अल्पकालीन पूर्वाग्रह सौम्य सकारात्मक झाला आहे, जो शॉर्ट-कव्हरिंग रॅलीमुळे प्रेरित आहे.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' शुक्रवारी निफ्टीने जिथे थांबले होते तिथेच तो पुन्हा सुरू केला, प ण पूर्णपणे वेगळ्या वातावरणात. राखेतून उठून, निर्देशांकाने उत्साही पुनरागमन केले आणि दिवसभरात जवळजवळ २०० अंकांची भर पडली. पूर्वीच्या ब्रेकडाउनमुळे आता अल्पकालीन घसरणी ला मार्ग मिळाला आहे असे दिसते, कारण बाजाराने अलिकडच्या कमकुवतपणाला बाजूला ठेवले आहे. आपण अद्याप पूर्णपणे धोक्यातून बाहेर पडलेलो नाही, परंतु सोमवारच्या अलीकडील नीचां की पातळीवरील उसळीमुळे आणखी वाढ होण्यास मदत होईल. तात्काळ आधार २४३३७ पातळीवर आहे, पुढील वाढीचे लक्ष्य २४८५० आणि २५००० पातळीच्या आसपास आहे.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी १ ५ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पुतिन यांच्याशी होणारी भेट झाल्याच्या बातमीमुळे सोन्याच्या किमतीत घट झाली. त्यामुळे संभाव्य तोडगा निघण्याचे संकेत मिळाले, ज्यामुळे नफा बुकिं ग सुरू झाले. कॉमेक्स सोने $३,४०० वरून $३,३५५ वर घसरले, तर MCX सोने १२०० ने घसरून १००५५० पातळीवर आले. या आठवड्यात, पुढील संकेतांसाठी यूएस CPI आणि कोअर CPI ( Consumer Price Index) डेटा फोकसमध्ये असतील. सोन्याच्या किमतीची श्रेणी ९९५००-१०२००० पातळी दरम्यान दिसून येते.'

आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' रुपया ८७.६० वर स्थिर राहिला, कारण डॉलर निर्देशांका तील अलिकडच्या कमकुवतपणामुळे, जो आज ९८.२५ पातळीच्या जवळ रेंज-बाउंड राहिला, त्याला काही आधार मिळाला. युक्रेन-रशिया शांतता उपक्रमावर अमेरिका-रशिया चर्चेच्या संभाव्य अहवालांमुळे एकूण कमकुवत ट्रेंड असूनही रुपया स्थिर राहण्यास मदत झाली. व्यापारी आता या आठवड्यातील यूएस सीपीआय आणि कोअर पीसीई डेटावर लक्ष केंद्रित करतात, जे डॉलरच्या हालचालींसाठी टोन सेट करू शकतात. अमेरिका आणि भारत यांच्यातील टॅरिफ वाटाघाटींमध्ये कोणतीही प्रगती रुपयाला आणखी आधार देण्याची शक्यता आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले की,'सलग सहा आठ वड्यांच्या घसरणीनंतर निफ्टी पुन्हा एकदा सावरला, तो २२२ अंकांनी वाढून २४,५८५ (+०.९%) वर बंद झाला. अमेरिका-रशिया शांतता चर्चा या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याच्या वृत्तानं तर जागतिक बाजारपेठेतील भावना सुधारल्या, तर भारतीय गुंतवणूकदारांनी शुक्रवारी १,९३३ कोटी रुपयांच्या एफआयआयच्या आवकेला आनंद दिला. सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, ज्याचे नेतृत्व पीएसयू बँक निर्देशांकाने केले (२% पेक्षा जास्त वाढ). एसबीआयने अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल दिल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खरेदीची मोठी आवड दि सून आली.

शिवाय, नवीन बचत खात्यांसाठी किमान शिल्लक आवश्यकता वाढवण्याच्या खाजगी कर्जदार आयसीआय सीआय बँकेच्या निर्णयामुळे पीएसबींमध्ये वाढ झाली. व्यापक बाजारपेठेतही सुधारणा दिसून आली, निफ्टी मिडकॅप१०० आणि स्मॉलकॅप१०० अनुक्रमे ०.९% आणि ०.४% ने वाढले. एलपीजीवरील अंडर-रिकव्हरीसाठी केंद्र सरकारने ३०००० कोटी रुपयांच्या भरपाई पॅकेजला मंजुरी दिल्यानंतर तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी) शेअर्समध्ये वाढ झाली.AMFI च्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमधील निव्वळ गुंतवणूक ८१% वाढून ४२,६७२ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याने AMC स्टॉक्सवर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असताना स्टॉक/क्षेत्र विशिष्ट कृती सुरूच राहतील. एकूणच, आ म्हाला अपेक्षा आहे की अमेरिकन टॅरिफवरील घडामोडी आणि या आठवड्यात होणाऱ्या अमेरिका-रशिया चर्चेच्या निकालांवर लक्ष ठेवताना बाजार स्थिर राहील.'

त्यामुळे उद्याच्या बाजारातील हा गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिल्यास बाजारात उद्याही वाढ होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु आगामी आठवड्यात अमेरिकेची पुढची पाऊले, ट्रम्प पु तीन भेट, चीनशी टेरिफ करार, तसेच अमेरिकेतील पुढील महागाई आकडेवारी ही बाजारावर प्रभाव पाडू शकते. तसेच आगामी निकालांच्या पार्श्वभूमीवर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरीही अधोरेखित करणे बाजाराच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल.
Comments
Add Comment