
मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो आणि के13 टर्बो सादर केले आहेत. के13 टर्बोची किंमत 8GB रॅम व 128GB स्टोरेजसाठी 27,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेजसाठी 29,999 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. लॉन्च ऑफर्ससह या किंमती अनुक्रमे 24,999 रुपये आणि 26,999 रुपये इतक्या होतात. हा फोन 18 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, K13 टर्बो प्रोची किंमत 8GB रॅम व 256GB स्टोरेजसाठी 37,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB स्टोरेजसाठी 39,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सनंतर या किंमती अनुक्रमे 34,999 रुपये आणि 36,999 रुपये इतक्या होतील. हा फोन 15 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. दोन्ही मॉडेल्स फ्लिपकार्ट, ओप्पोची अधिकृत वेबसाइट आणि कंपनीच्या रिटेल पार्टनर्समार्फत विक्रीसाठी असतील. के13 टर्बो प्रो सिल्वर नाईट, पर्पल फॅन्टम आणि मिडनाईट मॅव्हरिक या रंगांत तर के13 टर्बो नाईट व्हाईट, फर्स्ट पर्पल आणि मिडनाईट मार्व्हियर या रंगांत उपलब्ध असतील.
के13 टर्बो प्रोमध्ये 6.8-इंच LTPS अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,600 निट्स ग्लोबल पीक ब्राइटनेस मिळतो. दोन्ही मॉडेल्सना IPX9 रेटिंग असून 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटे टिकण्याची क्षमता आहे, मात्र धूळ-प्रतिरोधकता नाही. के 13 टर्बो प्रोला स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर, 8/12GB LPDDR5x रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेज दिले आहे. कॅमेऱ्यात 50MP सॅमसंग OV02B1B प्राथमिक लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर, तसेच 16MP सोनी IMX480 फ्रंट कॅमेरा आहे. 7,000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15-आधारित कलर ओएस 15 वर चालतो आणि दोन वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट व तीन वर्षांचे सिक्युरिटी पॅच मिळण्याचे आश्वासन दिले आहे.
के13 टर्बो मॉडेलमध्ये वरील सर्व वैशिष्ट्ये तशीच असून प्रोसेसरमध्ये बदल करण्यात आला आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 चिपसेट, जास्तीत जास्त 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज पर्याय आहेत. की या दोन्ही स्मार्टफोन्सची खासियत म्हणजे यात दिलेली इन-बिल्ट फॅन कूलिंग सिस्टीम, जी 18,000rpm पर्यंत फिरते आणि 0.1mm पातळ ब्लेड्समुळे उष्णता 2-4 अंश सेल्सियसने कमी करू शकते, अगदी ऊन असतानाही बीजीएमआय सारखे गेम खेळू शकता असे कंपनीचे म्हणणे आहे.