प्रतिनिधी:एचजी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आज जबरदस्त उसळी घेतली आहे. कंपनीचा समभाग (Share) सकाळच्या सत्रात थेट १२% ते १४% उसळला आहे. सकाळी १०.३९ वाजेपर्यंत कंपनीचा समभाग १३.८५% म्हणजेच जवळपास १४ % उसळला. कंपनीने २१९५.६८ कोटींचे कंत्राट (Contract) जिंकल्याने ही वाढ बाजारात झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आज बाजारात मोठा फायदा झाल्याने उपलब्ध माहितीनुसार कंपनीची उलाढाल १.४१ कोटींवर पोहोचली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचा पुनविर्कास कंत्राट व संबंधित पायाभूत सुविधांचे (Infrastructure) कंत्राट मिळाल्याने गुंतवणूकदारांनी या शेअरला सकाळच्या सत्रात मोठा प्रतिसाद दिला.
माहितीनुसार, ४५ महिन्याची मुदत या कंत्राटाला मिळाली असताना कंपनीला इतक्या मर्यादेत स्टेशनचे काम करावे लागेल. कंपनीची वर्षभरातील कामगिरी लक्षात घेता गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६८% वाढ झाली असून ५ वर्षात ४५२% वाढ झाली.मात्र या वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठे चढ उतारही झाले आहेत. कंपनी प्रामुख्याने इंजिनिअरिंग, प्रोकरमेंट, ईपीसी कन्स्ट्रक्शन, रस्ते व पायाभूत सुविधा बांधणी व सेवा या क्षेत्रात कार्यरत आहे. याशिवाय यापूर्वी ६ ऑगस्टला कंपनीने मिलेट्री इंजिनिअरिंग सर्विसेस कडून लेटर ऑफ अवॉर्ड देखील मिळवले होते ज्यामध्ये त्यांना मुंबईतील नौदल डॉकयार्डात मटेरियल बिल्डिंगचे कंत्राट मिळाले होते.