प्रवाशांना परतफेड किंवा रीबुकिंगचा पर्याय मिळेल
एअरलाइनच्या मते, ही उड्डाण सेवा स्थगित करण्याचे मुख्य कारण म्हणजे विमानांच्या ताफ्यात घट. एअर इंडियाने गेल्या महिन्यात त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे मोठ्या प्रमाणात रेट्रोफिट (आधुनिकीकरण) कार्यक्रम सुरू केले आहे. जे २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, एकाच वेळी अनेक विमाने सेवेबाहेर राहणार असल्याचे एअरलाइनने सांगितले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई हद्दीचे मार्ग सतत बंद राहत असल्याने लांब पल्ल्याच्या विमानांच्या मार्गात आणखीन वाढ होते, ज्यामुळे काम अधिक गुंतागुंतीचे होते.
कंपनीने म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२५ नंतर वॉशिंग्टन डीसीसाठी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिले जातील. ज्यामध्ये इतर फ्लाइट्सचे पुन्हा बुकिंग करणे किंवा पूर्ण परतफेड करता येऊ शकते.
वॉशिंग्टनला वन स्टॉप फ्लाइटने पोहोचण्यासाठी पर्याय
प्रवाशांना अजूनही एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदार - अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स - द्वारे न्यू यॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को येथूनवन-स्टॉप फ्लाइट घेऊन वॉशिंग्टन डीसीला जाता येईल. ज्यामध्ये त्यांचे सामान थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित ठेवले जाईल.