
साप्ताहिक राशिभविष्य,१० ते १६ ऑगस्ट २०२५
![]() | चांगली प्रगतीमेष : या सप्ताहात आपली राशी चांगली प्रगती करणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यवसायात प्रगती करता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. बौद्धिक क्षेत्रात वाव मिळणार आहे. प्रकृती जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होणार आहे. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळणार आहे. प्रवासाची शक्यता आहे. नव्या घटनांना काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. विरुद्धी लिंगी व्यक्तींबरोबर असलेल्या संबंधात गैरसमज होण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी थोड्याफार प्रमाणात जाणवणार आहेत. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. प्रगती होईल. |
![]() | समस्या संपुष्टात येतीलवृषभ : रोजच्या आठवड्यात शुभ ग्रहांची उत्तम साथसंगत लाभेल. आपल्या हातात असलेली महत्त्वाची कार्य पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी. तसेच जमीन-जुमला, स्थावर मालमत्तेची दीर्घ काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. समाधान मिळेल. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान लाभून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येतील. काहींना आपल्या मनातील जीवनसाथी निवडता येईल. प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळेल. काहींचे विवाह जमतील. तरुण-तरुणी आपल्या अर्थार्जनाचा शुभारंभ करू शकतील. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण परदेशी घेण्याचे स्वप्न साकार होईल. शिष्यवृत्तीचा लाभ होईल. व्यवसाय-धंद्यात नावीन्यपूर्ण कल्पना राबवू शकाल. |
![]() | सतत कार्यशील आणि प्रयत्नवादी राहामिथुन : आपल्या स्वकष्टाला यश येणार आहे. सतत कार्यशील आणि प्रयत्नवादी राहा. कंटाळा किंवा आळस करू नका. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागणार. आपल्या स्वतःच्या नैतिक नैपुण्याद्वारे यश मिळू शकणार आहे. दैनंदिन कामांमध्ये व्यग्र असणार आहात. व्यापार व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. संततीच्या प्रगतीने समाधान वाटणार आहे. स्वतःच्या क्षमतेने प्रगती होणार आहे. कामाचा उत्साह वाढणार आहे. आर्थिक बाजू चांगली राहणार आहे. सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अडथळे आले तरी त्यातून चांगले मार्ग निघणार आहेत. आत्मविश्वासाने व दृढनिश्चयाने कामे करा. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळेल. प्रगती होईल |
![]() | अधिकारांमध्ये वृद्धी होईलकर्क : या सप्ताहात आपण आत्मविश्वासपूर्वक कामे करणार आहात. सरकारी किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकारांचा चांगल्या कार्यासाठी वापर कराल. आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारांमध्ये वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. जवळचे प्रवास संभवतात. प्रवास कार्य सिद्ध राहतील. एखाद्या व्यक्तीचे आजारपण किंवा कुटुंबातील छोट्या-मोठ्या वादाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तुमच्याकडे लोक आदराने बघणार आहेत. नोकरीमध्ये आपण केलेल्या कार्याचा गौरव होऊन कौतुकास पात्र ठराल. अपेक्षित संधी मिळेल. प्रगती करू शकाल. अपेक्षित लाभ मिळतील. |
![]() | अपेक्षित फायदे होतीलसिंह : हा सप्ताह संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. डोळ्यांसंबंधित तक्रारी येऊ शकतात. सरकारी किंवा वरिष्ठ व्यक्तींशी वाद-विवाद टाळा. या संदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे. भागीदारीमधील व्यवसायात लक्ष देणे आवश्यक आहे. एखाद्या नवीन प्रकल्पातून फायदा होण्याची शक्यता आहे. जी योजना राबवत आहात त्याच्यात नशीब आपल्या बाजूने असेल. आपल्या कारकिर्दीत चांगली प्रगती होणार आहे. आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लागतील. |
![]() | निश्चित यश मिळणार आहेकन्या : प्रेम प्रकरणांमधून सावध असावे. फसवणुकीची शक्यता आहे. परिस्थितीचे भान ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींनी बोलताना फार सावध राहणे आवश्यक आहे. एखाद्या शब्दाने वाद-विवाद किंवा मानहानीचे प्रसंग होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यात सातत्य आणि नियोजनबद्ध काम केल्यास निश्चित यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत वृद्धी होणार आहे. रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. |
![]() | चांगले लाभ होणार आहेततूळ : काही खर्च अचानक समोर येणार आहेत. शिवाय आपल्या झोपेवर पण याचा परिणाम होणार आहे. निश्चितच प्रकृती स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ज्या स्त्रिया कामासाठी बाहेर पडतात त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व गोष्टीत सदसदविवेकबुद्धीने विचार करणे आवश्यक आहे. या सर्व काळामध्ये आपल्या जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. नवीन करारातून आपणास चांगले लाभ होणार आहेत. कुटुंबात पत्नीचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसाय-धंद्याच्या दृष्टिकोनातून पोषक निर्णय घेतले जातील. व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होऊ शकतात. |
![]() | कडू-गोड प्रसंग येण्याची शक्यता आहेवृश्चिक : वैवाहिक जीवनामध्ये कडू-गोड प्रसंग येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लहान-मोठे वादविवाद निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा मान ठेवणे हिताचे ठरेल. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये मात्र कुटुंबांमध्ये शांती असणार आहे. काहींचे विवाह अचानक ठरवून होतीलही. नवीन योजना आखून त्या कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मात्र सर्व बाबतीत धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. सकारात्मक विचारांची फार आवश्यकता आहे. |
![]() | नवीन संधी मिळणार आहेधनु : शुभ कालावधीत शुभ फळे प्रतिपादित होतील. कुटुंबातील पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. काहींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता येईल. गुरुजनांचे तसेच कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. तरुणांना नोकरी मिळेल. कलाकार, खेळाडू यांना कर्तृत्व सिद्ध करता येईल. चांगल्या संधीचे सोने करा. |
![]() | सहकार्य मिळणार आहेमकर : आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेम प्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होण्याची शक्यता आहे. पैसे अडकल्यामुळे पैशाची कमतरता भासू शकते. तरीसुद्धा वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर प्रगती करू शकाल. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी सन्मानाचे योग आहेत. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे. कष्टाची तयारी ठेवा. आर्थिक फायदे निश्चित. नोकरीतील आपल्या कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. कष्टाला फळ मिळेल. |
![]() | शत्रूचा पराजय होईलकुंभ : आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. तुम्ही सर्व अडचणींवर चांगल्या तऱ्हेने मात करणार आहात. आज शत्रूचा पराजय होईल. नोकरीमध्ये चांगला कालावधी आहे. कायदेशीर बाब सांभाळा. मित्रांनी अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदे होतील. मुलांच्या यशामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. घरातील व्यक्तींच्या आरोग्यविषयक तक्रारी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नाती जपा. काही गोष्टीने विनाकारण मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यवसाय-धंद्यातील समस्या यशस्वीपणे सोडवण्यात यश मिळेल. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. |
![]() | शांतपणे निर्णय घेण्याची गरजमीन : कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका. स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर अवलंबून राहणे नुकसानकारक ठरू शकते. शांतपणे निर्णय घेण्याची गरज. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. या कालावधीमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एखादा धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन प्रकल्प हाती घ्याल. उद्योग-व्यवसायातून फायदा मिळणार आहे. चुकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होण्याची शक्यता. नवीन संधीची शक्यता आहे. फायदे होतील. तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. |