महाड वरून सांदोशी गावाकडे जाणारी एस. टी. बस क्रमांक MH 20/BL3781 तर माणगाव वरून किल्ले रायगडाकडे जाणारी एस. टी. बस क्रमांक MH 14/BT1416 या दोन बसेस बांधणीच्या माळावर येताच समोरा समोर टक्कर झाली.
या अपघातात एसटी बस चालक अविनाश विंचोरकर तर गणपत कदम, सीता कदम, गणेश जाधव, राजाराम लांबर, अपर्णा शेडगे, पूजा मांडे, स्मिथ मांडे, स्वप्नील उमराटकर, वृषाली मोरे, सुचिता धोत्रे आदि प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पाचाड वैद्यकीय अधिकारी सुरज कोंडुळे यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.