
मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख ऊर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि भारतीय सुरक्षा एजन्सी यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
सलीम पिस्टल हा भारतातील सर्वात मोठा हत्यार तस्कर करणारा म्हणून ओळखला जातो.
गेल्या अनेक वर्षांपासून सलीम हा पाकिस्तानमधून अवैधरीत्या भारतात हत्यारांची तस्करी करत असून त्याचे पाकिस्तान, इसिस व डी गॅगशीही संबध असल्याचे अनेक पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. तपासात लॉरेन्स बिष्णोई व हाशिम बाबा यासारख्या कुख्यात गुंडटोळींना सलीम हत्यारे पुरवत होता.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीचा सलीम हा गुरू असल्याचेही तपासात समोर आले आहे. २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी सलीमला अटक केली होती. त्यानंतर सलीम परदेशात पळून गेला होता.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे.