
हिमांशी नरवाल बिग बॉस शो मध्ये दिसणार का?
सध्या बिगबॉसच्या आगामी १९ व्या सिझनची सर्वत्र चर्चा आहे. या सिझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. ज्यात पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय लष्कराचे जवान विनय नरवाल यांच्या पत्नीचे नाव देखील चर्चेत आहे. तर विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल यांना खरंच बिग बॉस १९ ची ऑफर मिळाली का? आणि त्या शोमध्ये दिसणार का? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
एप्रिल २०२५ मध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वांना हादरवून टाकले. या हल्ल्यात भारतीय लष्कराचा जवान विनय नरवाल देखील मारला गेला. विनयची पत्नी हिमांशी नरवालचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लग्नानंतर हे जोडपे हनिमूनसाठी पहलगाम येथे पोहोचले होते. पण या भयानक घटनेने त्यांना कायमचे वेगळे केले. विनयच्या मृत्यूने हिमांशी आणि तिच्या कुटुंबासह संपूर्ण देशाने अश्रू ढाळले.
आता बातमी आली आहे की हिमांशी नरवालला 'बिग बॉस १९' या रिअॅलिटी शोसाठी ऑफर मिळाली आहे. टेलि चक्करच्या वृत्तानुसार, बिग बॉसचे निर्माते हिमांशीला त्यांच्या शोमध्ये आणू इच्छितात कारण प्रेक्षक तिच्याशी आधीच जोडलेले आहेत. पोर्टलने सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, 'निर्माते शोमध्ये अशा काही लोकांना घेऊ इच्छितात, जे प्रेक्षकांशी त्वरित संपर्क साधतील आणि हिमांशी नरवालला बिग बॉस १९ मध्ये घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, याबद्दल अद्याप काहीही निश्चित झालेले नाही.'
या वृत्ताच्या उलट, सोशल मीडिया हँडलवर असे वृत्त आहे की हिमांशी नरवालला 'बिग बॉस १९' कडून कोणतीही ऑफर मिळालेली नाही. ती या शोचा भाग होणार नाही.
पहलगाम हल्ल्यात त्याचे पती आणि नौदल अधिकारी विनय नरवाल शहीद झाल्यानंतर हिमांशी नरवालचे नाव पहिल्यांदाच जगासमोर आले. यादरम्यान हिमांशी यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये त्या त्यांच्या मृत पतीच्या शेजारी बसून रडताना दिसल्या. या फोटोने संपूर्ण देशाचे मन हेलावले.
'बिग बॉस १९' कोणते स्पर्धक सहभागी होणार?
'बिग बॉस १९' चा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये सलमान खान एका नेत्याच्या भूमिकेत दिसला. यंदाच्या प्रोमोनुसार यावेळी बिग बॉसच्या घरात राजकारण चालणार आहे. घरातील सदस्य यावेळी सरकार चालवतील आणि ते सर्व निर्णय घेतील. जर काही चूक झाली तर घरातील सदस्यांना त्याचे फटका सहन करावे लागेल. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम स्टार शैलेश लोढा, गुरचरण सिंग, मुनमुन दत्ता यांना शोची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय लता सभरवाल, फैसल शेख, जन्नत जुबैर, पुरव झा आणि अपूर्वा मखीजा यांना ऑफर मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.