Sunday, August 10, 2025

मोरबे धरणाच्या पातळीत घट

मोरबे धरणाच्या पातळीत घट

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता


वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत ऑगस्ट महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा आहे. सन २०२३-२४ मध्ये ७ ऑगस्ट रोजी ९१.७३ टक्के भरले होते. गतवर्षी सन २०२४-२५ मध्ये देखील ९२.२३ टक्के धरण भरले होते. पण यावर्षी धरण फक्त ८१.२१ टक्केच भरलेले आहे. त्यामध्ये गत दोन वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली असून आतपासून नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


नारळी पौर्णिमेनंतर पाऊसाचा वेग मंदावतो. त्यामुळे आता पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वर्षी मे महिन्यापासून पाऊसांने सुरुवात केली होती. तर जुन- जुलै महिन्यात देखील समाधानकारक पाऊस झाला होता. पण ऑगस्ट महिन्यापासून पाऊसाने हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा साठा कमी आहे.


मोरबे धरण हे ८८ मीटर ला पुर्ण क्षमतेने भरत असते. पण आतापर्यंत धरणांत ८४.१७ मीटर इतकेच धरण भरले आहे. गत वर्षी धरणांची पातळी ही ८६.४७ टक्के भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत धरणात जवळपास दोन मीटरने कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसाने हुलकावणी दिल्यामुळे नवी मुंबईची डोकेदुखी वाढली आहे. मोरबे धरणात २१ एप्रिल २०२६ पर्यत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मेघगर्जनेसह कोसळणार पावसाची धार! 'या' भागात अलर्ट जारी; पहा २४ तास कसे असेल हवामान?

Comments
Add Comment