
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे भेटणार आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये समक्ष चर्चा होणार आहे.
या भेटीकडे सध्या जगाचे लक्ष लागलेले असताना भारताने या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे स्वागत केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या बैठकीत युक्रेनमधील संघर्ष संपवण्याची व शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे., भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर निवेदन जारी केले आहे.