
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाराज हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे घडलेल्या घटनेनंतर तातडीने राज्यातील पर्यटकांच्या मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. राज्य शासनाने उत्तरकाशीत राज्यातले पर्ययटक संकटात सापडल्याचे कळताच विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला होता. या कक्षाद्वारे नातलग, पर्यटक आणि सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय निर्माण करण्यात आला. राज्यातील पर्यटक नागरिकांना आवश्यक मदत पोहचवून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य देण्यात आले, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
उत्तराखंड सरकार, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्रातील प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केले. आपापसांत समन्वय राखला. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. जे पर्यटक राज्यात परतणार आहेत त्यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून परतीची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे उत्तरकाशी येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
#उत्तरकाशी येथे झालेल्या #भूस्खलन व पुरस्थितीमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित असून #धराली, #हर्षिल या आपत्तीग्रस्त भागातून राज्यातील सर्व नागरिकांना जॉली ग्रँड विमानतळ तसेच मताली कॅम्प या सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे. - आपत्ती व्यवस्थापन मंत्री @girishdmahajan… pic.twitter.com/nRsDQcyGfT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 9, 2025