Sunday, August 10, 2025

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक


नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून लुटण्याची घटना होत असल्याचे सीबीआयने रविवारी टाकलेल्या छाप्यानंतर समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी मुंबई येथील आहेत. सीबीआय या प्रकरणी सखोल तपास करीत आहे. १ कोटी २६ लाखाच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट त्या ठिकाणी काही व्यक्तींनी जागा भाड्याने घेतली होती. त्या ठिकाणी अॅमेझॉन सपोर्ट सर्विसेस नावाचे कॉल सेंटर उभारले होते. माध्यमातून बनावट फोन करून अमेरिका, कॅनडा व इतर देशातील नागरिकांची गिफ्ट कार्ड क्रिप्टो करेन्सी द्वारे फसवणूक सुरू असल्याचे तपासातून समोर आले आहे. सर्व करण्यासाठी या ठिकाणी ६२ कर्मचारी लाईव्ह पद्धतीप्रमाणे काम करत होते. सातत्याने नागरिकांना फोन करून गिफ्ट कार्ड व क्रिप्टो करेन्सी मध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून फोन केले जात होते. याबाबतचा एक गुन्हा शुक्रवारी सीबीआयकडे दाखल झाला होता तक्रार करणाऱ्या फिर्यादीने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती.

तपासात रोकडसह वस्तू जप्त


सीबीआय तपासात या ठिकाणी काही रोकड,पाचशे ग्रॅम सोने,एक कोटीच्या सात लक्झरी कार, क्रिप्टो करन्सी यासह २ हजार कॅनेडियन डॉलर ,चेक , गिफ्ट व्हाउचर अंदाजे त्याची भारतीय रक्कम ही १ कोटी २६ लाख आहे. एवढे सर्व साहित्य सीबीआयने रविवारी टाकलेल्या छाप्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >