भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्यूचा सापळा

४ वर्षांत १ हजार २०३ भारतीय मृत्युमुखी


टोरँटो  : कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. सरकारने संसदेत सांगितल्याप्रमाणे, गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये १००० हून अधिक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धापकाळ किंवा आजारपणासारख्या नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सरकारने कॅनडाहून ७५७ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाला गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल विचारण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना कीर्ती वर्धन सिंह यांनी संसदेत सांगितले की, "मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, २०२० ते २०२४ दरम्यान कॅनडामध्ये एकूण १ हजार २०३ भारतीयांचा मृत्यू झाला.

यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धत्व आणि गंभीर आजारामुळे झाले. शिवाय, अपघात, हिंसाचार, हत्या आणि आत्महत्या यांसारख्या अनैसर्गिक कारणांमुळे अनेक मृत्यू झाल्याची माहिती आहे."भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे एक विशिष्ट मानक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सर्व भारतीय दूतावास आणि केंद्र सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या समस्यांसाठी एकत्र काम करतात, अशी माहिती कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.

या प्रक्रियेत मृत्यू, स्थानिक पातळीवर अंत्यसंस्कार किंवा दफनविधीची व्यवस्था करणे, मृतदेह भारतात त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचवणे यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

भारताचा पाकिस्तानवर 'फार्मा' स्ट्राइक!

अफगाणिस्तानमध्ये भारतीय औषधांचा दबदबा काबुल : अफगाणिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे.

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ