ChatGPTवर डोळे झाकून ठेवला विश्वास, रुग्णालयात करावे लागले दाखल
न्यूयॉर्क: ChatGPTचा वापर करून अनेक कामे केली जाऊ शकतात. यात पत्र लिहिणे, कॅलक्युलेशन तसेच इमेज जनरेट करणे ही कामे केली जातात. न्यूयॉर्कमध्ये एका ६० वर्षीय व्यक्तीने ChatGPTला डाएटिशियन समजले. मात्र त्यावर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासामुळे या व्यक्तीस रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
ChatGPTवर एका व्यक्तीने प्रश्न विचारला त्यावर उत्तर म्हणून सोडियम ब्रोमाईड वापरण्याचा सल्ला देण्यात आसला. याचा वापर २०व्या शतकाच्या सुरूवातीस औषधांमध्ये केला जात असे. याता अधिक वापर करणे धोकादायक मानले जाते.
AIचा सल्ला मानताना त्या व्यक्तीने सोडियम ब्रोमाईडचा ऑनलाईन ऑर्डर दिली. यानंतर तीन महिन्यांपर्यंत वापर सुरू केला. काही दिवसांनी त्या व्यक्तीस अचानक मानसिक त्रास, भ्रम आणि खूप तहान लागू लागली. यानंतर त्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करावे लागले.
डॉक्टरांनी काही चेकअपनंतर त्यांना सोडियम ब्रोमाईडचा त्रास झाल्याचा निष्कर्ष काढला. सध्या अशा केसेस अजिबात आढळत नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीला तीन आठवडे रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर सोडियम क्लोराईडचा स्तर योग्य झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.