Saturday, August 30, 2025

वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद, मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र, लाडक्या बहिणींनी केली न्यायाची मागणी

वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद, मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र, लाडक्या बहिणींनी केली न्यायाची मागणी

"ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,”

वाई: साताऱ्यातील वाईमधील लाडक्या बहिणींनी रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिल्याची बातमी समोर आली आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहीण योजनांचे हफ्ते नव्हे तर न्याय हवा असल्याचे म्हंटले आहे. नेमके प्रकरण काय आहे, सविस्तर माहिती घेऊ.

वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर असलेल्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावा अशा मागणीसाठी महिलांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात काय लिहिले?

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्या १२ वा हफ्ता आता जमा होऊ लागला आहे, मात्र या दरम्यानच वाई तालुक्यातील बेकायदेशीरपद्धतीने सुरु असलेला दगडी खान क्रेशर विरोधात सुरु असलेल्या लॉन्ग मार्च समर्थनार्थ, काही महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले कि, “देवा भाऊ, ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा