
पालघर : विरार ते डहाणू रोडदरम्यानच्या पश्चिम रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण काम अपेक्षेपेक्षा खूपच संथ गतीने सुरू असून, मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प आता आणखी चार वर्षांनी म्हणजे जून २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या दोन वेगवेगळ्या उत्तरांतील विसंगतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. ठरलेला पाच वर्षांचा प्रकल्प आता किमान दहा वर्षांवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : दिल्लीत असताना दोन जण विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन मला भेटले. त्यांनी १६० जागा जिंकवून देण्याची हमी दिली. या दोन जणांना मी राहुल गांधींना ...
प्रत्येक वर्षी होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३,५७८ कोटी इतका सांगितला होता; मात्र विलंबामुळे हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
सध्याच्या दोन मार्गांवरील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. चौपदरीकरणामुळे गाड्यांचे वेळापत्रक सुधारेल आणि प्रवास सुरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रकल्प वारंवार लांबणीवर गेल्याने प्रवाशांचा त्रास वाढत आहे आणि संताप उसळला आहे.