Saturday, August 9, 2025

कावड यात्रेत ट्रक घुसल्याने पातूरच्या दोघांचा मृत्यू

कावड यात्रेत ट्रक घुसल्याने पातूरच्या दोघांचा मृत्यू
अकोला:  मध्य प्रदेशातील शिवणी येथे कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर येथील दोन युवक जागीच ठार झाले तर नऊ गंभीर जखमी झाल्याचे कळते. जखमींची नावे कुलदीप गाडगे (वय २५ ), सतीश तायडे ( वय २८), सचिन ढगे, गौतम उगवे, बंटी सोनोने, विठ्ठल थोरात, पुरुषोत्तम गिऱ्हे, ऋषी वानखडे अशी आहेत.

बांदोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चोर गरठिया गावाजवळ भरधाव ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला व पायी चालणाऱ्या कावडधाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश विजय पोहरे (दोघेही रा. पातूर) यांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Comments
Add Comment