Sunday, October 19, 2025
Happy Diwali

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी जयश्री आणि वय वर्षे ५ व ७ असलेल्या दोन मुलींची निर्घृण हत्या केली असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे की, त्यादिवशीही काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला असावा. त्यानंतर संतापाच्या भरात प्रदीपने हे अमानुष कृत्य केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील तपास वेगाने करण्यात येणार आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.रक्षाबंधनासारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

Comments
Add Comment