Friday, August 8, 2025

व्यावसायिकांच्या हक्काचे पहिले हॉकर्स पार्क

व्यावसायिकांच्या हक्काचे पहिले हॉकर्स पार्क

पथारी विक्रेत्यांसाठी सुनियोजित पार्क ‘नुक्कड’चे हस्तांतरण


पुणे : पथारी व्यावसायिकांसाठी पहिल्या सुनियोजित हॉकर्स पार्क ‘नुक्कड’ चे हस्तांतरण गुरुवारी पंचशील फाऊंडेशनचे अतुल चोरडिया यांनी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना केले. हे पार्क पंचशील फाऊंडेशनच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे. खराडी, सर्व्हे क्रमांक १, फाऊंटन रस्ता, वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ हे पार्क आहे. यावेळी शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते. तब्बल ८६ हजार चौरस फूट जागेत विस्तारलेल्या या विक्री क्षेत्रात विक्रेत्यांना हक्क्काची जागा मिळाली आहे.



‘प्रकल्पा’ची वैशिष्ट्ये 



  • प्रकल्पामध्ये १२० युनिट्स. ज्यात फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी ५० ओटे,

  • सामानांच्या खरेदीसाठी ५० युनिट्स

  • बेकरी, सलून, कार-सायकल दुरुस्ती, कुलूप दुरुस्ती, कार वॉश सेवा

  • भाज्यांसाठी पोटॅशियम धुण्यासाठी २० युनिट्स

  • फुलविक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते आणि फूड ट्रकसाठी कंटेनर

  • प्रसाधनगृह, ५० चार चाकी व १५० दुचाकींसाठी पार्किंग सुविधा

  • शिपिंग कंटेनरचा पुनर्वापर करीत पर्यावरण-जागरूक डिझाइन



“सीएसआर उपक्रमांमधून नुक्कड हा प्रकल्प विकसित करून आम्ही सर्वांसमोर एक यशस्वी उदाहरण ठेवत आहोत. शहरातील विविध ठिकाणी पालिका या प्रकल्पाचे अनुकरण करू शकते. पुणे पालिकेच्या हद्दीत आज सुमारे २२०० भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत असून अशा काही भूखंडांचा वापर नुक्कडसारख्या संकल्पनांसाठी नक्कीच करता येईल. पुढील ३ वर्षे पंचशील फाऊंडेशनच्या वतीने नुक्कडची देखभाल करण्यात येईल. खराडीमुळे तब्बल ३ लाख नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तब्बल तीन पट नागरिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. मेट्रो कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे. ''
- अतुल चोरडिया, पंचशील फाऊंडेशन


Comments
Add Comment