Saturday, August 9, 2025

सुधारित आयकर विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार

सुधारित आयकर विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत १३ फेब्रुवारी रोजी सादर केलेले आयकर विधेयक, २०२५ मागे घेतले आहे. बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केलेल्या बहुतांश शिफारशींचा समावेश असलेले सुधारित आयकर विधेयक ११ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले जाणार आहे.


संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच निवड समितीने लोकसभेत आयकर विधेयक, २०२५ वरील अहवाल सादर केला होता. भाजप खासदार बैजयंत पांडा यांनी हा अहवाल सभागृहात सादर केला होता.


हे विधेयक का मागे घेण्यात आले? याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, योग्य कायदेविषयक अर्थ सांगण्यासाठी ज्या सूचनांचा समावेश करणे गरजेचे आहे त्या प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी सरकारने हे विधेयक मागे घेतले आहे.

Comments
Add Comment