Saturday, August 9, 2025

टेरिफचा फटका ! टाटा मोटर्सचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात 'इतकी' घसरण

टेरिफचा फटका ! टाटा मोटर्सचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात 'इतकी' घसरण
प्रतिनिधी: देशातील महत्वाची ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिमाहीत ट्रम्प यांच्या टेरिफ वाढीचा फटका बसला आहे. विशेषतः त्याचा अधिक फटका जग्वार उत्पादनात बसला. कंपनीच्या या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर एकत्रित महसूलात (Consolidated Revenue) मध्ये २.५% घसरण झाल्याने एकत्रित महसूल १०४४०७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३०% घसरण झाल्याने या वर्षाच्या तिमाहीत नफा ३९२४ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी निव्वळ नफा ५६४३ कोटींवर होता. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २.५% घसरण झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत हा महसूल १.०८ लाख कोटी होता आता तो १.०४ कोटी रुपये झाला. कंपनीच्या एकूणच सगळ्या श्रेणीत व्हॉल्यूम व नफा घटल्याने महसूलात परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या ईबीआयटीडीए (EBITDA) मध्ये ३६% घसरण झाली असून ही कमाई ९७०० कोटींवर पोहोचली आहे.

मागणीची परिस्थिती आव्हानात्मक राहण्याची शक्यता असल्याने, कंपनीने म्हटले आहे की ते व्यवसायाच्या मूलभूत गोष्टी मजबूत करण्यावर आणि टेरिफचा प्रभाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित क रत राहील, जेणेकरून ब्रँडची ताकद वाढून चांगले मिश्रण (Mix) निर्माण होईल आणि योगदान मार्जिन सुधारण्यासाठी लक्ष्यित कृती केल्या जातील. दरम्यान ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा फटका टाटा जॅग्वारला झाला आहे. ज्यामध्ये जॅग्वारमधील महसूलात ९% घसरण झाली.

टाटा मोटर्सने म्हटले आहे की, सर्व व्यवसायांमधील व्हॉल्यूममध्ये घट आणि प्रामुख्याने जग्वार लँड रोव्हरमधील नफ्यात घट झाल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफमुळे लक्झरी ऑटोमेकरच्या महसुलावर परिणाम झाला, जो ९ टक्क्यांहून अधिक घसरून £६.६ अब्ज झाला आहे, तर करपूर्व मार्जिन (EBIT Margin ४९० बेसिस पूर्णांकाने (bps) घसर ण एकूण ४ टक्क्यांनी घसरला आहे.

महसुलात घट झाली असली तरी, जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ने आर्थिक वर्ष २६ साठी त्यांची मार्गदर्शन श्रेणी (Guidance Range) ५-७ टक्क्यांनी अपरिवर्तित (Unchanged) कायम ठेवली आहे. '३० जून २०२५ पासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या यूके-उत्पादित वाहनांवरील शुल्क २७.५% वरून १०% पर्यंत कमी करण्यासाठी यूके-यूएस व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचे स्वागत आ हे. २७ जुलै २०२५ रोजी जाहीर झालेल्या ईयू-यूएस व्यापार करारामुळे, अमेरिकेत निर्यात होणाऱ्या जेएलआरच्या ईयू उत्पादित वाहनांवरील शुल्क २७.५% वरून १५% पर्यंत कमी होईल,' असे कं पनीने त्यात म्हटले आहे.

टाटा मोटर्सच्या विलगीकरणाबद्दल कंपनीने म्हटले आहे की,' त्यांच्या पीव्ही (Personal Vehicle) आणि सीव्ही (Commercial Vehicle) व्यवसायाच्या विलगीकरणाबद्दल बोलताना, टाटा मोट र्सने म्हटले आहे की विलगीकरण योजनेसाठी अंतिम सुनावणी एनसीएलटीने पूर्ण केली आहे आणि ऑर्डर राखीव ठेवली आहे. ऑटोमेकरला अपेक्षा आहे की चालू तिमाहीच्या अखेरीस विलगीकर ण पूर्ण होईल. विलगीकरण १ ऑक्टोबरपासून लागू करण्याचे उद्दिष्ट आहे.'

मागणी कमी असल्याने दोन्ही विभागांसाठी तिमाही मंदावला होता असे कंपनीनं यावेळी म्हटले. 'मागणी परिस्थिती आव्हानात्मक राहण्याची शक्यता असल्याने, आम्ही व्यवसायाच्या मूलभूत गोष्टी मजबूत करण्यावर आणि ब्रँडच्या ताकदीचा वापर करून चांगले मिश्रण तयार करण्यावर आणि योगदान मार्जिन सुधारण्यासाठी लक्ष्यित कृतींवर लक्ष केंद्रित करत राहू,' असेही टाटा मोटर्सने त्यां च्या एक्सचेंज रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

या तिमाहीतील कंपनीच्या कामगिरीबद्दल बोलताना, टाटा मोटर्स ग्रुपचे मुख्य वित्तीय अधिकारी पी.बी. बालाजी म्हणाले आहेत की,'कठीण मॅक्रो अडथळे असूनही, व्यवसायाने मजबूत मूलभूत गो ष्टींमुळे नफा मिळवणारा तिमाही दिला. टेरिफ स्पष्टता उदयास येत असताना आणि सणासुदीच्या मागणीत वाढ होत असताना, आम्ही कामगिरीला गती देण्याचे आणि पोर्टफोलिओमध्ये गती पुन्हा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत. ऑक्टोबर २०२५ मध्ये होणाऱ्या डिमर्जरच्या पार्श्वभूमीवर, आमचे लक्ष दुसऱ्या सहामाहीत मजबूत कामगिरी करण्यावर आहे.'
Comments
Add Comment