महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार


पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा, अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून ही ओवाळणी देण्याची मागणी शुक्रवारी केली.


नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करण्याची मागणी केली. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी या उपक्रमाचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांना अनेक हिंदू महिलांनी राखी बांधली व लव्ह जिहादविरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून दिली.


कायदा संमत करून अमलात आणावा
‘महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून नंतर जबरदस्तीने धर्मांतरास भाग पाडले जाते. या घटनांमध्ये मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार घडत असून त्याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र व कठोर कायदा आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात असा कायदा नाही. परिणामी पोलिसांनाही कारवाई करताना कायदेशीर मर्यादा भेडसावत आहेत. म्हणून राज्य सरकारने कठोर कायदा संमत करून अमलात आणावा,’ अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी