गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी; तारखेचा घोळ?

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी २८ ऑगस्ट, पाचव्या दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी १ सप्टेंबर, गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाचवा दिवस हा १ सप्टेंबर नसून तो ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्याची बाब गणेशोत्सव समितीने लक्षात आणून दिली आहे.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी मार्च महिन्यात जाहीर केली होती. त्यात मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे; परंतु यामध्ये तारखांचा गोंधळ असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी समन्वय समितीने शहर व उपनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे.


ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. हा कायदा ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यात आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी हे ध्वनिक्षेपक लावता येतात.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी