
बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १५.४९% वाढ झाली असून नफा ३०५४४ कोटींवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ व्याज मार्जिंन (Net Inter est Margin NIM) मध्ये मात्र ३२ बेसिस पूर्णांकाने (bps) घट झाली. बँकेच्या विना व्याज उत्पन्नातही (Non Interest Income NII) मध्ये ५५.४०% वाढ होत उत्पन्न १७३४६ कोटींवर पोहोचले आहे. व्यवसायाच्या बाबतीत, एकूण कर्जे ११.६१ टक्क्यांनी वाढून ४२.५५ लाख कोटी रुपये झाली, जी विविध विभागांच्या वाढीमुळे झाली. किरकोळ वैयक्तिक कर्जे (Retail Personal Loan) १ २.५६ टक्के, एसएमई कर्जे (SME Loan) १९.१० टक्के, कृषी कर्जे (Agricultural Loan) १२.६७ टक्के आणि कॉर्पोरेट कर्जे (Corporate Loan) ५.७० टक्के वाढली.
बँकेच्या एकूण ठेवी ११.६६ टक्क्यांनी वाढून ५४.७३ लाख कोटी रुपये झाल्या आहेत. तसेच माहितीनुसार, चालू खात्यातील ठेवी ३०.६९ टक्के आणि बचत बँक ठेवी ४.७१ टक्के वाढल्या. सीएएसए (CASA) ठेवी प्रमाण ३९.३६ टक्के होते, जे गेल्या वर्षीच्या ४०.७० टक्क्यांपेक्षा किंचित कमी होते.बँकेच्या एकूण ठेवी (Total Deposits) ११.६६ टक्क्यांनी वाढून ५४.७३ लाख कोटी रुपये झाल्या, चालू खात्यातील ठेवी ३०.६९ टक्क्यांनी वाढल्या आणि बचत बँक ठेवी ४.७१ टक्क्यांनी वाढल्या. कासा (CASA) प्रमाण ३९.३६ टक्के राहिले जे गेल्या वर्षीच्या ४०.७० टक्क्यांपेक्षा किंचित कमी आ हे.
मालमत्तेची गुणवत्ता (Asset Quality) मजबूत होत राहिली आहे. एकूण एनपीएत मालमत्ता (Non performing asset NPA) प्रमाण पहिल्या तिमाहीत (Q1FY25) २.२१ टक्क्यांवरून १.८३ ट क्क्यांपर्यंत सुधारले आणि निव्वळ एनपीए (NPA) प्रमाण ०.५७ टक्क्यांवरून ०.४७ टक्क्यांपर्यंत घसरले. तरतूद कव्हरेज रेशो (PCR) ७४.४९ टक्के होता.