Saturday, August 9, 2025

शनिवार विशेष: सगळ्यांनाच सोन्याची आस पण गुंतवणूकीसाठी खरच सोने खास?

शनिवार विशेष: सगळ्यांनाच सोन्याची आस पण गुंतवणूकीसाठी खरच सोने खास?

मोहित सोमण


सध्याच्या काळात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला सोन्यात गुंतवणूक करावीशी वाटते. याचा संदर्भ पौराणिक काळातही आढळतो. हिंदु संस्कृतीत, सिं धू संस्कृतीत 'सुवर्ण' हा शब्द मात्रृतुल्य आहे. सोनेचांदी हे दोनच दागिने असे आहेत की ज्याला सांस्कृतिक अधिष्ठान आहे. सध्याच्या काळातील घडामोड पाहता सोन्याच्या गुंतवणूकीत महत्व न क्कीच भारतीयांच्या मनात कोरले गेले असेल. सोन्यानेही भारतीयांच्या मनामनावर रुढीपरपरंपरेहीत अधिराज्य गाजवले. पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का? की सोने ही डेड अथवा निष्क्रि य गुंतवणूक आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील टेरिफमध्ये भरमसाठ वाढ केल्याने गुंतवणूकदार मेटाकुटीला आले. भारता आज प्रत्येकाला सोन्यात गुंतवणूक हवीहवीशी वाटत प्रत्येकाला वा टत सोन्यात गुंतवणूक करून भविष्य उज्वल करावे प्रत्येकाला भविष्यात मोठा परतावा (Return) हवा असतो. प्रत्येकाला गुंतवणूकीचा मोठा परतावा हवा असतो पण खरंच सोने हा गुंतवणूकीचा हुकुमी एक्का आहे का?


चला मग जाऊन घेऊयात नाही ना मग चला ऐकूयात वॉरेन बफे (Waren Buffet) यांना. वयाच्या ९४ व्या वर्षी आजही ते जगाला उमेद दाखवत आहेत. त्यांच्या मते सोने ही डेड गुंतवणूक आहे. ती एक निष्क्रिय गुंतवणूक आहे. माणूस आपले पैसे त्यात लॉक करुन ठेवतो. त्यांच्या मते ही डेड गुंतवणूक यासाठी आहे कारण ते क्रियाशील नाही. २०११ साली 'सोन्यात दोन लक्षणीय कमतरता आहेत, ते फारसे उपयुक्त नाही किंवा प्रजननक्षम नाही. खरे आहे, सोन्याची काही औद्योगिक आणि सजावटीची उपयुक्तता आहे, परंतु या उद्देशांसाठी मागणी मर्यादित आहे आणि नवीन उत्पादन शोषण्यास असमर्थ आहे. दरम्यान, जर तुमच्याकडे अनंतकाळासाठी एक औंस सोने असेल, तर शेवटी तुमच्याकडे एक औंस सोने असेल.' असे वॉरेन बफे यांनी गुंतवणूकदारांना आपल्या संदेशा त म्हटले होते.


सोन्यात आपण दीर्घकालीन गुंतवणूक नक्कीच करु तर ते वाढत नाही तर ते तसेच राहते दरम्यान जर तुमच्याकडे बाँड असेल, शेअर असेल अथवा इतर आर्थिक उत्पादनतील गुंतवणूक असेल त र ती तुम्ही वाढवू शकता जे सोन्यात शक्य नाही.अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळप्रसंगीच तुम्हाला सोन्याची आठवण येते आणि संकटाच्या काळात तुम्हाला सोने महत्वाचे वाटते. त्यामुळे लोक संकटात अधिकाधिक गुंतवणूक सोन्यात करत राहतात. त्यांना वाटते त्यातून आपली भविष्यातील पोझिशन मजबूत होईल पण खरेच असेच होत का? हा यक्षप्रश्न आहे.


उदाहरणार्थ वॉरेन बफे यांना जेव्हा विचारले गेले होते की तुम्हाला सोन्यात का शेतजमीन अथवा व्यवसायात पैसा गुंतवायला आवडेल तेव्हा त्यांनी जमीन व व्यवसाय उत्तर दिले होते.त्यांच्या मते सो ने हे निष्क्रीय आहे. जमीन व व्यवसायातून दीर्घकालीन गुंतवणूक शक्य आहे ज्यातून मुल्य निर्मिती होते सोन्याला गुंतवणूकीचे साधन जरी मानले तरी त्याला आयुष्य नाही ' त्यामुळे जगभरातील स र्वात मोठे गुंतवणूकदार व एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे यांचा सोन्यावर हा विचार होता.


याचा अर्थ सोन्यातील गुंतवणूक वाईट आहे असा होत नाही पण सोन्याच्या काही मर्यादा आहे. बहुदा दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलेही जात असेल तरी ती एक झोपाळु गुंतवणूक च आहे. ती थंड गुंतवणूक गुंतवणूकीला निष्क्रीय बनवते‌. अर्थात तुम्हाला ५ ते १० वर्षात सोन्यात चांगला परतावा मिळू शकेल पण सोने मूल्य निर्मिती करत नाही. उलट ते एका जागी पडल्याने गुंत वणूकीची सायकल थंड पडते. उदाहरणार्थ जे २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ४४५० ते ४४०० रूपये होते ते २०२५ मध्ये प्रति ग्रॅम १०० १०३०० रुपये आहे. म्हणजेच गेल्या २५ वर्षात मिळणारा परतावा के वळ प्रति ग्रॅम ६००० रुपयांनी वाढला. दुसरीकडे हीच गुंतवणूक दुसरी असेल तर शेअर्समधील गुंतवणूकीने १५.२३% किंवा त्याहून अधिक सीएजीआर ( Compond Annual Growth Rate C AGR) यील्ड दिला आहे. हाच परतावा सोन्याने २५ वर्षात केवळ ९ ते १०% सीजजीआर (CAGR) दिला आहे. सोन्यात वर्षाला साधारण १०% इतका परतावा मिळालाय. प्रत्यक्षात सोन्याची किंमत २००० ते २०२५ पर्यंत १०७५% वाढली. पण हातात प्रत्यक्ष सीएजीआर दर १०% वर मिळाला नाही. त्यामुळे सोन्यात दिर्घकाळ गुंतवणूकीच केली पाहिजे तर गुंतवणूकीची इतर साधनेही आहेत. २ ०२० नंतरच, गुंतवणूकदारांना त्यांचा सुवर्णकाळ अनुभवायला मिळत आहे कारण गेल्या पाच वर्षांत सोन्यात ९०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.


२००९ मध्ये, जेव्हा सोने $१,००० वर होते तेव्हा त्यांना विचारण्यात आले की पाच वर्षांत तुम्हाला सोने कुठे दिसते, तेव्हा त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे ' ते तुमच्याकडे पाहण्याशिवाय काहीही करणार ना ही' विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, $१,८०० वर पोहोचल्यानंतर, २०१४ पर्यंत सोने पुन्हा $१,००० वर घसरले. गुंतवणूकदारांनी त्यांच्या सोन्याच्या गुंतवणुकीकडे पाहिले आणि त्या पाच वर्षांत कोणता ही परतावा मिळाला नाही. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कोरोनानंतर सोन्यात मागणी आली मात्र याच वेगाने सोन्यात मागणी वाढेल का? प्रत्यक्ष सोन्यात ग्राहकांचा खरेदीकडे कल राहिल का या सगळ्या जरतरच्या गोष्टी होतील का खरेच पुन्हा सोन्यात आणखी नवीन उच्चांक पहायला मिळेल हा जागतिक समीकरणावर अवलंबून असू शकते.


मात्र सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक किती करावी हे मात्र गुंतवणूकदारांच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याची पुंजी एकाच सोन्याचा टाकून त्यातून किती फायदा भविष्यात होईल हे मात्र भ विष्यात ठरेल. तत्पूर्वी आपली गुंतवणूकदार करताना एका उत्पादनात गुंतवणूकीची मर्यादा न घालता विविध परतावा देण्यासाठी असलेल्या आर्थिक उत्पादनात (Financials Products) मध्ये दिर्घकालीन पैसा टाकल्यास त्याचा उत्पादित फायदा होऊ शकतो. नेमका हाच मुलमंत्र वॉरेन बफे यांनी दिला.


बफेट यांचे जीवन हे या वस्तुस्थितीचे एक उदाहरण आहे की तुमच्याकडे अब्जावधी मालमत्ता असली तरीही साधे जीवन जगणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी गुंतवणूक करणे शक्य आहे. त्यांचे सर्वात लोकप्रिय वाक्य म्हणजे - 'नियम क्रमांक १: कधीही पैसे गमावू नका. नियम क्रमांक २: कधीही नियम विसरू नका' हे पाळल्यास संयमी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास यशच अधिक मिळू शकते.


नक्की सोने हे गुंतवणूकीचे मोठे साधन आहे पण ते सर्वस्व नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे.वॉरेन बफेट म्हणतात,'संपत्ती निर्माण करणारे गुंतवणूकदार उत्पन्न निर्माण करणाऱ्या आणि कालांतराने वाढणाऱ्या उत्पादक मालमत्ता मिळविण्यावर लक्ष केंद्रित करतात. सोने व्यापाराच्या संधी देऊ शकते, परंतु ते उत्पादक मालमत्ता नाही आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये योगदान देत नाही. हा धडा सोने कमी का पडते आणि यशस्वी पोर्टफोलिओ तयार करण्यात उत्पादक मालमत्तांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करतो. वॉरेन बफेटकडून मौल्यवान अंतर्दृष्टी जाणून हुशार, संपत्ती निर्माण करणारे गुंतवणूक निर्णय कसे घ्यावेत ते शोधण्याची गरज आहे.


२०११ साली बफे यांनी शेअरहोल्डर यांना एक खास पत्र लिहिले होते ज्यात बफेट तीन प्रकारच्या गुंतवणुकीची माहिती दिली होती.सोन्याला दुसऱ्या श्रेणीत ठेवले आहे, ज्यामध्ये अशा मालमत्तेचा समावेश आहे ज्या कधीही काहीही उत्पन्न करणार नाहीत. बफेट यांच्या मते, खरेदीदार भविष्यात त्यांच्यासाठी कोणीतरी अधिक पैसे देईल या आशेने या मालमत्ता खरेदी करतात. 'मालक स्वतः काय उत्पन्न करू शकतात याने प्रेरित होत नाहीत' ती कायमची निर्जीव राहील तर भविष्यात इतरांना त्याची अधिक उत्सुकतेने इच्छा असेल असे ते म्हणाले होते.


त्यामुळे सरतेशेवटी सोन्यात गुंतवणूक करावी का हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग असला तरी सोन्यात गुंतवणूक करताना काही मूलभूत बाबींवर लक्ष दिले पाहिजे ते म्हणजे आपल्याला सोन्याच्या गुंतवणूकीत कुठले उद्दिष्ट आहे किती परतावा हवा? भविष्यात काय फायदा? किती गुंतवणूक आवश्यक यांचा विचार करूनच सोन्यात गुंतवणूक केली तर ती अधिक संयुक्तिक ठरेल.

Comments
Add Comment