
• एआय साउंड ऑप्टिमायझेशन, डायनॅमिक बास कंट्रोल, अॅक्टिव्ह व्हॉईस अँप्लीफायर प्रो, जायरो सेन्सरसह कन्वर्टिबल फिट, Q-सिम्फनी प्रो, वायरलेस डॉल्बी अॅटमॉस आणि स्मार्ट व जलद अनुभवासाठी मल्टी-प्लॅटफॉर्म कनेक्टिव्हिटीचा समावेश
गुरुग्राम: भारतातील सर्वात मोठ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडपैकी एक असलेल्या सॅमसंगने आज आपला २०२५ साउंडबार लाइनअप लाँच केला आहे. यामध्ये ऑडिओ इंटेलिजन्स, अॅडॅप्टिव्ह डिझाइन आणि स्मार्ट होम इंटिग्रेशनमध्ये पुढील पिढीतील आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. भारतीय घरांच्या आणि पाहण्याच्या सध्याच्या सवयींनुसार डिझाइन करण्यात आलेली ही नवीन साउंडबार रेंज विविध फॉर्म फॅक्टर्समध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि पर्सनलायझेशन घेऊन येते.नवीन लाइनअपमध्ये फ्लॅगशिप HW-Q990F आणि कन्वर्टिबल HW-QS700F मॉडेल्सचा समावेश आहे. ही रेंज जगातील काही आघाडीची इनोव्हेशन सादर करते जी तुमच्या दैनंदिन मनोरंजन अनुभवाला एक नवीन उंची देते.
कंपनीने जाहीर केलेल्या उत्पादनामधील वैशिष्ट्ये:
एआय साउंड ऑप्टिमायझेशन: कंटेंटनुसार रिअल-टाइममध्ये ऑडिओ ट्यूनिंग
डायनॅमिक बास कंट्रोल: कोणतीही विकृती न होता खोल आणि समृद्ध लो-एंड साउंडसाठी
अॅक्टिव्ह व्हॉईस अँप्लीफायर प्रो: संवाद अधिक स्पष्ट करण्यासाठी कन्वर्टिबल फिट डिझाइन
इनबिल्ट जायरो सेन्सर: साउंड बार कसा ठेवला आहे त्यानुसार साउंड अॅडजस्ट करतो
एक कॉम्पॅक्ट वायरलेस सबवूफर कमी जागेतही शक्तिशाली बास देतो, Q-सिम्फनी प्रो सॅमसंग टीव्हीसोबत सिंक्रोनाइझ्ड साउंड निर्माण करतो, तर वायरलेस डॉल्बी अॅटमॉस वायरशिवाय थेट सिनेमॅटिक 3D ऑडिओचा अनुभव देतो.
याविषयी बोलताना सॅमसंग इंडियाचे विप्लेश डांग, सीनियर डायरेक्टर आणि हेड व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेस म्हणाले आहेत की,' सॅमसंगचे नवीन साउंडबार्स आमच्या प्रीमियम टीव्ही सिस्टीमसो बत उत्तम प्रकारे काम करतात. हे आता व्हिजन एआयसह येतात आणि रोजच्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला आणखी शानदार बनवतात. ही रेंज उत्कृष्ट साउंड इंजिनिअरिंगचे उदाहरण आहे, जी स्लिक डिझाइनमध्ये कमालीचे लवचिकतेसह येते. एआयच्या मदतीने अॅडॅप्टिव्ह साउंड आणि आकर्षक डिझाइनसह, आमची नवीन साउंडबार रेंज त्या सर्वांसाठी योग्य आहे जे आधुनिक, सुंद र आणि कार्यक्षम ऑडिओ सोल्यूशन्स शोधत आहेत. तुम्ही चित्रपटप्रेमी असाल, साधेपणा पसंत करत असाल किंवा स्मार्ट होम तयार करत असाल – सॅमसंगच्या नवीन रेंजमध्ये तुमच्यासाठी एक परफेक्ट साउंडबार नक्कीच आहे, जो तुमच्या घर, स्टाईल आणि गरजांनुसार अगदी योग्य ठरेल.'