सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचा मुंबईतला सेट तोडला, शूटिंग रद्द

  101

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात मुख्य कलाकराच्या भूमिकेत आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निवडक साहसी दृश्यांचे शूटिंग अर्थात चित्रिकरण मुंबईत करण्याचे नियोजन होते. या शूटिंगसाठी मुंबईत मेहबूब स्टुडिओमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्याचा सेट उभारला होता. हा सेट तोडण्यात आला आहे. सलमानच्या चित्रपटाचे मुंबईतले शूटिंग रद्द झाले आहे.

भारत आणि चीनच्या सैनिकांचा गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संघर्षाचा संदर्भ असलेला भारतीय कर्नलची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बॅटल ऑफ गलवान'. या चित्रपटाचे ऑगस्ट महिन्यात मुंबईत शूटिंग करायचे नियोजन होते. आता हे शूटिंग रद्द झाले आहे.

चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्येच सुरू होणार आहे. चित्रपटातील साहसी दृश्यांचे शूटिंग २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात होणार आहे. मुंबईतील सेटवरचे शूट आणि लडाखमधील शूट यात किमान ३० दिवसांचे अंतर राहणार होते. यामुळे चित्रपट सातत्य अर्थात सिनेमा कंटिन्यूटीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका होता. यामुळेच मुंबईतले ठरलेले सेटवरचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे.

'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात सलमान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबूची भूमिका साकारत आहे. चित्रांगदा सिंग पहिल्यांदाच सलमानसोबत दिसणार आहे. जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज हे कलाकार पण या चित्रपटात दिसतील.

विषय संवेदनशील असल्यामुळे आवश्यक ती परवानगी घेतल्यानंतरच चित्रपटाच्या शूटिंगचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध

‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

वडापाव म्हटले की जिभेला पाणी सुटते. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसेच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती