
ज्यांना इतकी रक्कम जमा ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी निर्णय धक्कादायक ठरू शकतो त्यामुळे सहाजिकच ग्राहकांमध्ये नाखुशी पसरण्याची शक्यता आहे कदाचित काही ग्राहक आप ले खाते देखील बंद करू शकतात. बँकेच्या माहितीनुसार, जो ग्राहक आपले खाते शिल्लक नियमित राखणार नाही त्याला तूटीवर ६% अथवा ५०० रूपये जो कमी आहे तो लागणार आहे. निवृत्ती धारकांना मात्र या निर्णयातून सुट मिळणार आहे.
ज्यांची फँमिली बँकिंग खाती असतील त्यांच्यासाठी आवश्यक त्या तरतूदीचे पालन करावे लागणार आहे. तरच त्यांना या दंडातून मुक्तता मिळेल. एकूण फँमिली बँकेच्या खात्यातील १.५ पटीने आवश्यक तरतूदीची पूर्तता न केल्यास तो दंड पडेल असे बँकेने म्हटले आहे. यावर अनेक ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली. या अपडेटवर प्रतिक्रिया देताना, अनेक वापरकर्त्यांनी बँक त्यांच्या संपत्तीच्या आधारे "ग्राहकांना फिल्टर" करत असल्याचा आरोप केला. काहींनी या निर्णयाला "एलिटिस्ट" म्हटले, तर काहींनी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
'ही नागरिकांची निव्वळ लूट आहे. @RBI लक्षात घ्या, त्यावर झोपू नका. आयसीआयसीआय जनतेच्या खर्चावर इतक्या मोठ्या रकमेवर व्याज मिळवणार आहे. @ICICIBank ला लाज वाटावी. मी शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँक खाते ठेवत होतो पण आता मी माझे बँक खाते बंद करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बँकेत जाणार आहे, जिथे ते शून्य आहे,' एका वापरकर्त्याने लिहिले.
'याला सार्वजनिक लूट म्हणतात. गरीब आणि उपेक्षित वर्गातील लोकांना बँकिंग सेवा नाकारणे. @ICICIBank द्वारे असे प्रवेश नियंत्रण निर्माण केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्ग त हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व @RBI च्या नाकाखाली घडत आहे.'अशी टिप्पणी आणखी दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.