
नियमित एसटी स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळासाठी एसटी महामंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात तात्पुरते ४० बस थांबे निश्चित केले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बसथांब्यावरून कोकणात जादा गाड्या पाठवण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणासाठी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याची घोषणा महामंडळाने केली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष गाड्यांमध्ये सवलत आहे. पण नियमित गाड्यांच्या आरक्षणावर १५ टक्के सवलत जादा गाड्यांसाठी लागू करण्यात आलेली नाही. जादा गाड्यांपैकी १,५४७ गाड्यांचे सामूहिक आणि ५३३ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे. सध्या १०६ गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील कोणकोणत्या थांब्यांवरुन सुटणार बस ?
मुंबई सेंट्रल - साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफ परेड, काळबादेवी, महालक्ष्मी
परळ - सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल (जोगेश्वरी)
कुर्ला नेहरूनगर - बर्वेनगर, सर्वोदय, टागोरनगर, घाटला, डी.एन. नगर, गुंदवली, आनंदनगर, शास्त्रीनगर, पार्ले, खेरनगर, वांद्रे, शीव
ठाणे - लोकमान्यनगर, श्रीनगर, विटावा, भाईंदर, नॅन्सी कॉलनी, मालाड, डहाणूकरवाडी / चारकोप, महंतचौक, संकल्प सिद्धी गणेश, भांडुप (पश्चिम आणि पूर्व), मुलुंड
विठ्ठलवाडी - बदलापूर, अंबरनाथ
कल्याण - डोंबिवली
नालासोपारा - नालासोपारा आगार
पनवेल - पनवेल आगार
उरण - उरण आगार
वसई - वसई आगार
अर्नाळा - अर्नाळा आगार