Saturday, August 9, 2025

राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्याकडून घुसखोरांना ‘वोट बँक’ म्हणून संरक्षण

राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्याकडून घुसखोरांना ‘वोट बँक’ म्हणून संरक्षण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप


नवी दिल्ली : बिहार निवडणूक जवळ आली आहे. त्यापूर्वी मतदार पुनर्वेक्षण करायला हवे की नाही, हे मी जनतेला विचारतो. घुसखोरांना मतदार यादीतून हटवायला हवे का? लालू प्रसाद, तुम्ही कोणाला वाचवू इच्छिता? निवडणूक आयोगाच्या यादीवर तुमच्या पक्षाने आणि काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. बांगलादेशातून येणारे घुसखोर बिहारच्या तरुणांच्या नोकऱ्या हिरावतात आणि तुम्ही त्यांना वाचवता. राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव घुसखोरांना वोट बँक म्हणून संरक्षण देतात, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.


देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचाअधिकार नाही 


अमित शहा यांनी एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना म्हटले की, पूर्ण बहुमताने बिहारमध्ये एनडीए सरकार येणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत.


Comments
Add Comment