Saturday, August 9, 2025

पेटीएम बनली पूर्णपणे 'मेड इन इंडिया'

पेटीएम बनली पूर्णपणे 'मेड इन इंडिया'
पेटीएम आता टाटा इतकीच झाली भारतीय

मुंबई: जवळपास नऊ वर्षांपूर्वी, पेटीएमचे (Paytm) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, 'आम्ही मारुतीएवढेच भारतीय आहोत.' तेव्हा हे विधान केवळ एक प्रतीकात्मक वक्तव्य मानलं गेलं, पण आज तेच विधान सत्यात उतरलं आहे, कारण पेटीएम आता मालकीहक्क आणि आत्मा या दोन्ही दृष्टीने पूर्णपणे भारतीय कंपनी बनली आहे. या बदलावर प्रतिक्रिया देताना या व्यवहाराशी संबंधित एका सूत्राने स्पष्टपणे सांगितलं,'पेटीएम आता टाटां इतकीच भारतीय झाली आहे.' हा बदल अधिकृतपणे तेव्हा झाला, जेव्हा अलीकडेच अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही. ने पेटीएममधील आपली उरलेली ५.८४% हिस्सेदारी सुमारे ३,८०० कोटी रुपयांना ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकली. यानंतर पे टीएम मध्ये असलेली चिनी मालकी शून्यावर आली आहे, आणि त्यामुळे कंपनीच्या मालकीच्या रचनेत एक मोठा बदल घडला आहे.

२०१६ मध्ये विजय शेखर शर्मांनी पेटीएमचा भारताच्या विकासातील सहभाग आणि कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली होती. त्यांनी भारतीय मूल्यप्रणाली आणि राष्ट्रीय प्राधान्यांप्रती कंपनीच्या नि ष्ठेबाबत भर दिला होता. तेव्हा भारतीय स्टार्टअप्समध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची प्रचंड रसवाढ दिसत होती, पण त्यातही पेटीएमने स्थानिक नियमांचे पालन, 'भारत-प्रथम' दृष्टिकोन आणि ग्राहक व व्यापार्‍यांना सशक्त करण्याच्या दिशेने आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या दूरदृष्टीतून, त्यांनी भारतातच उभं राहिलेल्या जागतिक दर्जाच्या डिजिटल तंत्रज्ञान कंपनीचं स्वप्न पाहिलं होतं असे कंपनीच्या सुत्रांनी म्हटले आहे.

आता अँट ग्रुपच्या पूर्ण निर्गमामुळे पेटीएमची मालकी रचना पूर्णपणे स्थानिक आणि जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारां कडे वळली आहे. हा संरचनात्मक बदल अशा काळात घडला आहे, जेव्हा पेटीएमने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत भक्कम कामगिरी केली आहे. नोएडा स्थित कंपनीने १२३ कोटींचा करानंतरचा नफा नोंदवला — जो कंपनीचा पहिला पूर्णतः नफ्याचा तिमाही निकाल ठरला आणि विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला सिद्ध झाला. कंपनीचा महसूल १९१८ कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यात वार्षिक २८% वाढ झाली आहे, तर योगदान नफा १,१५१ कोटी झाला, ज्यात ५२% ची वार्षिक वाढ झाली.

पेटीएम भारतातील सर्वात विश्वसनीय आणि जलद पेमेंट अ‍ॅप्सपैकी एक, ग्राहकांसाठी मोबाईल पेमेंटचा अनुभव अधिक सुरक्षित व सुलभ बनवत आहे. अलीकडे कंपनीने पाच महत्त्वपूर्ण फीचर्स सु रू केले आहेत, काही पेमेंट्स लपवण्याची किंवा दाखवण्याची गोपनीय सुविधा, होम स्क्रीनवर 'रिसीव्ह मनी' सारखे विजेट्स, मोबाईल नंबर न उघड करता यूपीआय व्यवहारासाठी खास यूपीआय आयडी तयार करण्याची मुभा, एक्सेल किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये यूपीआय डिटेल्स डाउनलोड करण्याची सोय, आणि सर्व यूपीआय लिंक केलेल्या बँक खात्यांची एकत्रित शिल्लक एकाच ठिका णी पाहण्याची सुविधा यांचा समावेश आहे.

आपला आंतरराष्ट्रीय विस्तार वाढवत पेटीएम आता संयुक्त अरब अमीरात, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, श्रीलंका आणि नेपाळमध्ये देखील यूपीआय पेमेंट्सची सुविधा देत आहे, ज्यामुळे भार तीय प्रवाशांसाठी परदेशातही व्यवहार अधिक सहज आणि सुलभ झाले आहेत.
Comments
Add Comment