
नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि दहशतवादविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे ५५ लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केला होता. त्यांच्या या टिप्पणीनंतर लगेचच तासाभरात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे कोणतेही लष्करी विमान पाडले गेले नाही किंवा नष्ट केले गेले नाही, असे म्हंटले आहे.
मुळात, ऑपरेशन सिंदूरदरम्यानचे भारतीय हवाई दलाने सादर केलेले भक्कम पुरावे संपूर्ण जगाने पाहिले आहे. उपग्रह छायाचित्रांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. तरीही पाकिस्तानने त्यांचे कोणतेही मोठे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे कधीच मान्य केले नाही. त्याचा हाच सूर आजही कायम दिसून आला.

बंगळुरू : ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व दलांनी परस्पर समन्वय राखून स्वतःचे ...
ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि त्यांची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडण्यात आले, असे एअर चीफ मार्शल म्हणाले. याबाबत माहिती देताना ते सांगतात, 'आम्हाला डागडुजी सुरू असलेले पाकिस्तान लष्कराचे किमान एक AWC हँगर आणि काही F-16 विमानांची माहिती मिळाली आहे. तसेच आम्हाला पाच लढाऊ विमाने पाडल्याची पुष्टी मिळाली आहे, ज्यात एक मोठे विमान किंवा AWC होते, जे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य केले गेले.'