
सांताक्रूझ, माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक
मुंबई : शनिवार मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी अप जलद मार्गावर सकाळी रात्री १२ ते पहाटे ४ आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १२. ३० ते पहाटे ४.३० पर्यंत सांताक्रूझ आणि माहीम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाईल.
या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व गाड्या अंधेरी आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवसा ब्लॉक असणार नाही.