'महावतार नरसिंह' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅचिन्लकच्या मते, होम्बाले फिल्म्सच्या 'महावतार नरसिंह' ने पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या आठवड्यात, 'सैयारा' आणि 'सन ऑफ सरदार २' - 'धडक २' सारख्या चित्रपटांसमोरही या चित्रपटाने आश्चर्यकारक गल्ला जमवला. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात ७३.४ कोटीची कमाई केली. तर १५ व्या दिवशी हे कलेक्शन ७.५ कोटी झाले आणि १६ व्या दिवशी संध्याकाळी ७:१५ वाजेपर्यंत त्याने १२.४७ कोटी कमावले, ज्यामुळे या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १३८.१२ कोटी इतके झाले.
'महावतार नरसिंह' ने 'मुफासा द लायन किंग' चा विक्रम मोडला
गेल्या वर्षी हॉलिवूड चित्रपट 'मुफासा द लायन किंग' ने १३७.८५ कोटी कमाई करून भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेटेड चित्रपटाचा विक्रम केला होता. तर 'महावतार नरसिंह' ने अवघ्या १६ दिवसांत तो विक्रम मागे टाकला आहे.
'महावतार नरसिंह' चे पुढचे लक्ष्य 'द लायन किंग'
हॉलिवूडचा २०१९ चा 'द लायन किंग' हा चित्रपट आता 'महावतार नरसिंह' चे पुढचे लक्ष्य असणार आहे. द लायन किंगने भारतात १५८.४० कोटी कमाई केली होती. जर 'महावतार नरसिंह' ने तो टप्पा ओलांडला तर तो भारतात प्रदर्शित झालेल्या कोणत्याही भारतीय किंवा परदेशी अॅनिमेटेड चित्रपटाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल.
'महावतार नरसिंह'चे बजेट आणि जगभरातील कलेक्शन
कोइमोई यांच्या मते, हा चित्रपट फक्त १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. सॅकनिल्क यांच्या मते, या चित्रपटाने १५ दिवसांत जगभरात १५६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.