Saturday, August 9, 2025

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार चालवणाऱ्या मुजोर वाहन मालकाला अटक

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार चालवणाऱ्या मुजोर वाहन मालकाला अटक

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखा परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन समाजातील काही लोकांनी एक नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्यामध्ये कबुतरांना खायला घालण्यासाठी दादर परीसरात  फिडिंग कार फिरवण्यात येत होत्या. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत कार चालकाची मुजोरी दिसून आली. काय करायचे ते करा अशाप्रकारची अरेरावी ती व्यक्ती करत होती. पण आता, या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्याचे वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.


लालबागमधील महेंद्र संकलेचा या व्यक्तीकडून कबुतरांना खाद्य पुरवण्यासाठी या 'फिडिंग कार' चालवल्या जात होत्या. एवढेच नाही तर आणखी १२ गाड्या येणार आहेत, असेही संकलेचा सांगताना दिसून आले.



फिडिंग कार चालवणाऱ्या व्यक्तिची मुजोरी व्हिडिओत कैद





 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)





न्यायालयाने कबुतरखाना बंद केला म्हणून जैन समाजाने दादर परिसरातील कबुतरांना धान्य टाकण्यासाठी नवीन पर्याय राबवला आहे. ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले. दादरच्या कबुतरखाना परिसरात एका चारचाकी वाहनाच्या टपावर कबुतरांसाठी धान्याने भरलेला ट्रे ठेवलेला दिसून आला. लालबागचे रहिवासी असलेल्या जैन महेंद्र संकलेचा यांनी अशाप्रकारे दादर परिसरात कबुतरांसाठी फिडींग कार सेवा सुरु केली. एवढेच नाही तर आणखी १२ गाड्या येणार आहेत, अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली. त्यांचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जी काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. माझ्या गाडीचा नंबर घेऊन आरटीओला तक्रार करा, असे ही या व्हिडिओमध्ये बोलल्याचे पाहायला मिळाले.



कबूतरखाना संदर्भात पुढील सुनावणी १३ ऑगस्टला


कबूतरखाने सुरू ठेवायचे की बंद करायचे? यावरील पुढील सुनावणी ही 13 ऑगस्टला पार पडणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिर्केने कबूतरखाने झाकले आहेत. पण जैन धर्मियांकडून भावना अनावर होत याविरोधात आंदोलन केले. तर काही जणांनी टेरेसवर गाडीच्या छतावर आता धान्य कबुतरांना टाकण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दादर येथील कबूतरखान्याच्या येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


Comments
Add Comment