
भारताच्या सैन्य दलांनी परस्पर समन्वय राखून एक प्रभावी योजना राबवली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ३०० किमी. लांबून अचूक हल्ला केला. या हल्ल्याद्वारे भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. पाकिस्तानच्या नष्ट झालेल्या विमानांमध्ये एफ १६ विमानांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी केला. भारताने कसा एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमध्ये काय वाताहात झाली याची सविस्तर माहिती त्यांनी एका सादरीकरणाद्वारे दिली. पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केल्याचेही एअर चीफ मार्शल म्हणाले. एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यानात बोलताना एपी सिंग यांनी एस - ४०० क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात पाकिस्तानची विमानं नष्ट झाल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टिमने अर्थात एस - ४०० ने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. भारताच्या सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यावर हल्ला केला, ज्यामध्ये रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाजवळील नूर खान एअरबेसला टार्गेट करण्यात आलं होतं. भारताने सलग दुसऱ्या दिवशी स्ट्राइक करुन पाकिस्तानचे अतिरेकी तळ नष्ट केले. भारताने ९० मिनिटांचया एअर स्ट्राईकद्वारे नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफीकी एअरबेस, पंजाबमधील मुरीद एअरबेस, सिंधमधील सुक्कुर एअरबेस, सियालकोट एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कार्दू एअरबेस, कराचीजवळील भोलारी एअरबेस, जेकबाबाद एअरबेस आणि पसरूर एअरस्ट्रिपवर हल्ला केला, असे एअर चीफ मार्शल म्हणाले.'मोदी सरकारने सैन्य कारवाईचे स्वातंत्र्य दिले' . .#prahaarnewsline #marathinews #prahaarshorts #viralvideo #maharashtranews pic.twitter.com/6oYIPafO7k
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) August 9, 2025
'भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं नष्ट केली' . .#prahaarnewsline #marathinews #lalbaugcharaja #prahaarshorts #viralvideo pic.twitter.com/vK9zNbLI7e
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) August 9, 2025