प्रतिनिधी: भारत आणि ओमान यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराचा (FTA) निष्कर्ष आणि स्वाक्षरी लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आ हे. सध्या व्यापार कराराचा मजकूर ओमानमध्ये अरबी भाषेत अनुवादित केला जात आहे. त्यानंतर, दोन्ही देशांचे मंत्रिमंडळ कराराला मान्यता देतील, असे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.'दोन्ही देशांनी तत्वतः निष्कर्ष जाहीर करण्याचा आणि एकत्रितपणे स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे',असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
याशिवाय या कराराला दोन ते तीन महिने लागतील का असे विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले त्यापेक्षा खूपच कमी कालावधी लागू शकतो. अधिकृतपणे व्यापक आर्थिक भागीदारी करार (C EPA) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करारासाठीच्या चर्चा औपचारिकपणे नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू झाल्या होत्या त्याला आता अंतिम स्वरूप मिळू शकते. अशा करारांमध्ये, दोन व्यापारी भागी दार त्यांच्यामध्ये होणाऱ्या जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमाशुल्क लक्षणीयरीत्या कमी करतात किंवा काढून टाकतात आणि दोन देशांमध्ये व्यापार मुक्तहस्त 'ड्युटी' फ्री करण्याची परवानगी देतात. ते सेवांमध्ये व्यापार वाढविण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणतात.
ओमान हा भारतासाठी गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांमध्ये तिसरा सर्वात मोठा निर्यात गंतव्यस्थान आहे. भारताचा आधीच जीसीसी (GCC) सदस्य असलेल्या युएसई UAE सोबत अ साच करार आहे, जो मे २०२२ मध्ये लागू झाला होता. द्विपक्षीय व्यापार (Bilateral Trade) युएसडीUSD १० अब्जपेक्षा जास्त होता..२०२४-२५ मध्ये द्विपक्षीय व्यापार १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता (निर्यात ४.०६ अब्ज डॉलर्स आणि आयात ६.५५ अब्ज डॉलर्स). भारताची प्रमुख आयात पेट्रोलियम उत्पादने आणि युरिया आहेत. आयातीपैकी हे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. इतर प्र मुख उत्पादने म्हणजे प्रोपीलीन आणि इथिलीन पॉलिमर, पेट कोक, जिप्सम, रसायने आणि लोखंड आणि स्टील ही प्रामुख्याने उत्पादने आयात केली जातात.